High Court on Adipurush : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने सिनेमातील काही डायलॉग्स बदलले देखील आहेत. त्यातच आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि सेन्सॉर बोर्डला देखील फटकारलं आहे. ( High Court shout on Adipurush Makers and Sensor Board )
या चित्रपटाविरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सोमवारी 26 जून 2023 ला सुनावणी झाली. त्या याचिकेवर न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि सेन्सॉर बोर्डला देखील फटकारलं आहे. न्यायमुर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती श्रीप्रकाश सिंह यांच्या बेंचने यावर सुनावणी दिली. तर वकील रंजना अग्निहोत्री यांनी बाजू मांडत सिनेमातील आक्षेपार्ह गोष्टींचा माहिती दिली.
व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे वेणुगोपाल धूत यांना मातृशोक
काय म्हटलं न्यायालय?
चित्रपट हे समाजाचा आरसा आहे. असं म्हटलं जात. मात्र या अशा प्रकारच्या चित्रपटांमधून तुम्ही येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार? सेन्सॉर बोर्ड काय करतं? त्यांना त्यांची जाबाबदारी समजत नाही का? रामायण, कुराण, गुरू ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांना तरी सोडा. अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि सेन्सॉर बोर्डला देखील फटकारलं आहे. त्याचबरोबर या सुनावणीला चित्रपटाचे निर्माते उपस्थित नसल्याने न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली.