व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे वेणुगोपाल धूत यांना मातृशोक

  • Written By: Published:
Dhoot

अहमदनगर : केशरबाई नंदलाल धूत (kesharbai-nandlal-dhoot) यांचे अहमदनगर येथे आज वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता कायगाव टोका (प्रवरासंगम) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे वेणुगोपाल धूत, माजी खासदार राजकुमार, प्रदीप धूत यांच्या त्या मातोश्री होत्या. तर किशोरीलाल, राधावल्लभ, रमेश, श्रीगोपाल धूत यांच्या त्या काकी होत्या. केशरबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी गरुजू लोकांना शैक्षणिक व आर्थिक मदत केली. पंढरपूर येथे त्यांच्या प्रयत्नातून धर्मशाळा उभारण्यात आली आहे. (kesharbai-nandlal-dhoot-passed-away)

धूत कुटुंबीय हे मूळचे अहमदनगरमधील आहेत. त्यांनी मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग साम्राज उभे केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube