Download App

सिनेसृष्टीवर मोठी शोककळा! विमान अपघातात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा 2 मुलींसह मृत्यू

Christian Oliver Death: हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर (Christian Oliver) याचा त्याच्या दोन लहान लेकींसह अपघाती मृत्यू झाला आहे. (Christian Oliver Dies ) त्यांचे छोटे विमान टेकऑफच्या काही वेळातच कॅरेबियन समुद्रात कोसळले, असे स्थानिक पोलिसांनी (Police) माहिती दिली आहे. ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ सारख्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकलेला अभिनेता ऑलिव्हर, गुरुवारी एका छोट्या खाजगी विमानाने प्रवास करत असताना, हा धक्कादायक अपघात घडला आहे. या अपघातात अभिनेत्यासह त्याच्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे उपस्थित असलेल्या मच्छीमार आणि तटरक्षकांनी लगेच घटनास्थळी पोहोचून, चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. या विमानाने प्रवास करत असलेला 51 वर्षीय अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर, त्याच्या मुली मदिता (10 वर्षे), आणि अॅनिक (12वर्षे) यांच्यासह पायलट रॉबर्ट सॅक्स यांचा देखील धक्कादायक अपघातीत मृत्यू झाला आहे. त्यांचे हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी रात्रीच्या सुमारास सेंट लुसियाला जाणार होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर याने इंस्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्याचा फोटो आणि त्याला हटके कॅप्शन देत आपण फॅमिलीसोबत सुट्टीवर जात असल्याचं सांगितलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ओलीवहार त्याच्या फॅमिलीसह प्रवासाला गेला होता. त्याच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या. परंतु, अभिनेत्याच्या अपघाती निधनाची बातमी ऐकताच आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Pune : नाट्य संमेलनाच्या शुभारंभात दीडशे कलाकारांनी रंगवला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’

अभिनेता खिश्चन ऑलिव्हर याने त्याच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळे चित्रपट आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम केले होते. अभिनेता टॉम क्रूझचा सिनेमा ‘वाल्कीरी’मध्ये देखील ऑलिव्हर झळकला होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याने टीव्ही सिरीयल ‘सेव्ह बाय द बेल: द न्यू क्लास’ आणि सिनेमा ‘द बेबी-सिटर्स क्लब’मध्ये साकारलेल्या अभिनयामुळे तो खूप गाजला होता. ऑलिव्हरने लोकप्रिय जर्मन कॉप शो ‘अलार्म फर कोब्रा 1’च्या दोन सीझन्समध्ये काम केले होते.

follow us

संबंधित बातम्या