Ahmednagar Police : भाविकांचे दागिने चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली

  • Written By: Published:
Ahmednagar Police : भाविकांचे दागिने चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली

Ahmednagar Police अहमदनगर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनाला सर्वत्र भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा फायदा चोरटेही उचलतात. मोहटादेवी, नगरमधील केडगावदेवी, बुऱ्हाणनगर येथील देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. या ठिकाणी चोऱ्या होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून गस्तही घालण्यात येत आहे. केडगाव देवी (Kedgaon Devi) मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने व पैशांची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात महिलांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) जेरबंद केले आहे.

मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल

कोतवाली पोलिस ठाण्यात दोन महिलांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा, एका महिलेवर चोरी केल्याचा, आणि पाच महिलांवर संशयास्पद चोरीच्या उद्देशाने फिरण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अमृता भिमराज काळे (वय २२ वर्ष, रा. समतानगर), प्रतीक्षा प्रदीप काळे (वय २२ वर्ष, रा. अंबिका कॉलनी, केडगाव), रिना बाळू भोसले (रा.अंबिका नगर, केडगाव), सुनीता चैतराम सोळंखी (वय ३०, रा. शिवाजीनगर, कल्याणरोड), सुरज श्रीखंड चव्हाण (वय २०, रा.समता नगर केडगाव), कविता अंकल भोसले (वय ३०, रा.भानसहिवरे, ता.नेवासा) शिवकन्या विशाल भोसले (वय १९ वर्षे, रा.भानसहिवरे ता.नेवासा) अशी महिला आरोपींची नावे आहेत.

‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

केडगाव देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही तसेच समांतर पेट्रोलिंगसाठी कोतवाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसरात कोतवाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना काही महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्या. चोरी करणाऱ्या आणि चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन टोळ्यातील सात महिलांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश इंगळे, योगेश भिंगारदिवे अभय कदम, अमोल गाडे, गणेश धोत्रे, संदीप थोरात, विश्वास गजरे, रवी टकले, सत्यम शिंदे, प्रमोद लहारे तानाजी पवार, सोनाली भागवत, स्वाती तोरडमल, पूजा दिक्कत, सविता शेंडगे गृहरक्षक दलाचे निलेश गजरे, प्रतीक ठोंबरे, सुषमा मोरे, शितल रोकडे यांनी ही कारवाई केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube