‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
पुणेः पहिल्या निवडणुकीतलं तात्यासाहेबांचं (अनंत पवार) योगदान आयुष्यात कधीच विसरणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. पुण्यातील दौैंडमध्ये आज अनंत पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. विशेष म्हणजे राजकीय मतभेदानंतर शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार नेमकं काय बोलणार? याकडं लक्ष लागलेलं होतं. मात्र, अजित पवार आणि शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिती कुठलंही भाष्य न केल्याचं दिसून आलं आहे.
ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?
शरद पवार म्हणाले, राजकारणात माझी नूकतीच सुरुवात झाली होती. मी विधानसभेला उभे राहण्याच्या प्रतिक्षेत होतो. तेव्हा वय माझं 26 होतं, त्याचवेळी आमदारकी लढवयाचं ठरवलं. त्यावेळी निवडणुकीत माझ्याविरोधात मोठे लोकं विरोधात होते. त्या काळात निवडणुकीचं अर्थकारण तात्यासाहेबांनी चांगल्या पद्धतीने सांभाळून मला मोठ्या मताधिक्क्याने राज्याच्या विधानसभेवर पाठवल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
तसेच पहिल्या निवडणुकीत मला अनेकांचं सहकार्य लाभलं पण तात्यासाहेब आणि आप्पासाहेबांनी निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. निवडणुकीत त्यांनी लोकांच्या घरोघरापर्यंत पोहोचून प्रामाणिकपणे काम केलं होतं. त्यावेळी निवडणुकीसाठी एवढा खर्च येत नव्हता. निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी तात्यासाहेबांनी घेतली, निवडणुकीचं अर्थकारण त्यांनी गाजावाजा न करता सांभाळलं होतं. तात्यासाहेबांचं निवडणुकीतलं योगदान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरु शकत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Photos : नवदाम्पत्य रावघ परिणीतीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा फोटो
तात्यासाहेब (अनंत पवार) यांचा स्वभाव माणसं जोडण्याचा होता, त्यांनी सहकारी चळवळीतही काम केलं आहे, त्यामुळे त्यांचा चांगलाच जनसंपर्क होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम अग्रेसर राहायचे, त्यांनी स्वतचा कधीच विचार केला नाही. ज्यावेळी तात्यासाहेब(अनंत पवार) यांचा मृत्यू झाला त्याचवेळी सुप्रिया सुळेंच्या मुलाचा जन्म झाला होता. दोघांच्या जन्माची आणि मृत्यूची वेळ एकच होती. त्यामुळे सुळेंचा मुलगा विजयला पाहताच तात्यासाहेबच आमच्या आजूबाजूला असल्याची जाणीव होत असल्यांचही शरद पवार सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच मंचावर आल्याचं दिसून आले आहेत. या कार्यक्रमामध्ये शरद पवारांसह अजित पवारांनी कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही. परंतु अजित पवार यांनी शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख करीत संस्थेची प्रगतीबद्दल भाष्य केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या समोरच त्यांनी कर्मचाऱ्यांना दम देऊन चांगलं काम करण्याच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळालं.