ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?

ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?

नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहमतीने या नियुक्त्यांची माहिती दिली. (Former Maharashtra Chief Minister Ashok Chavan has been appointed by the Congress as a special observer for the Telangana assembly elections.)

तेलंगणा राज्य अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याशेजारील राज्य म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील देगलूर सारखा तालुका तेलंगणाच्या सीमेवरील तालुका आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची तेलंगणाशी अत्यंत जुनी ओळख आहे. तेलंगणातील बरेच प्रश्न चव्हाण यांना परिचीत आहेत. सोबतच तेलंगण भारत राष्ट्र समिती आणि भाजप या दोन्ही पक्षांचाही चव्हाण यांचा मोठा अभ्यास आहे. याच गोष्टीचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!

अशोक चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन :

अशोक चव्हाण यांना मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर सातत्याने नव्या जबाबदाऱ्या मिळताना दिसत आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षातील सर्वोच्च अशा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय उदयपूर आणि रायपूर या राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांच्याकडे राजकीय मसुदा समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच निवडणुकांमध्ये समिक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

Sharad Pawar : ‘कंत्राटी’चा वाद पेटला! पवारांनी बावनकुळेंची लायकीच काढली; म्हणाले, ज्या व्यक्तीबद्दल..

माणिकराव ठाकरे अन् अशोक चव्हाण यांच्यावर खास जबाबदारी :

तेलंगणाचे प्रभारी म्हणून काँग्रेसने यापूर्वीच राज्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. विधानपरिषदेवरील आमदारकीची मुदत संपताच ठाकरे यांच्याकडे ही नवी जबाबदारी देण्यात आली होती. ठाकरे यांनी तेलंगणामध्ये मागील काही दिवसांपासून चांगली वातावरण निर्मीती केली असून काँग्रेसला इथे यश मिळणार असल्याचा अंदाज काही एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता चव्हाण यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने दोन मराठमोळ्या चेहऱ्यांवर काँग्रेसची तेलंगणामधील मदार असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube