“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

“बडी सोच करो, बडा दिलं रखो” : अजितदादांसोबत एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. (Supriya Sule advised the workers as Ajit Pawar and Sharad Pawar will be on the same platform)

दरम्यान, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.  कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पवार एकत्र आहेत का असा संभ्रम पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी “सगळे राजकारणाच्या छोट्या चौकटीतून पाहु नका, बडी सोच करो, बडा दिलं रखो” असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

कंत्राटी भरतीवरुन फडणवीसांचे आरोप; अजितदादांकडे बोट दाखवत शरद पवारांचे प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो विद्याप्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार, अजित पवार, श्रीनिवास पवार, प्रताप पवार, सुप्रिया सुळे, नंदा पवार, सुनेत्रा पवार, शर्मिला पवार असे सगळे पवार उपस्थित असणार आहेत. विद्याप्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, माझ्या काकांच्या नावाने ती शाळा असणार आहे. त्यामुळे सगळेच पवार हजर असणार आहेत.

यात कार्यकर्त्यांच्या संभ्रमाचा प्रश्न नाही. तो विद्याप्रतिष्ठानचा सामाजिक कार्यक्रम आहे. अशा अनेक संस्था आहेत, ज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत. यशवंतराव चव्हाण सेंटर, नेहरु सेंटर, रयत शिक्षण संस्था अशा अनेक संस्था आहेत. सगळे राजकारणाच्या छोट्या चौकटीतून पाहु नका. बडा सोचो, बडा दिलं रखो, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर

विरोधक दिलदार असावा :

मागील काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. तसंच वाढदिवसालाही सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बॅनर लावण्यात गैर काय? आमच्यात लोकशाही आहे, दडपशाही नाही. संविधानात अधिकार दिला आहे. त्यातही कुणी तरी माझ्या विरोधात लढणारच ना. मी तर म्हणते कुणीतरी लढल पाहिजे, विरोधक पणं दिलदार पाहिजे. मग लढायला मजा येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube