Horrific accident in Bhandup; Marathi child artist’s Purva Rasam mother crushed by bus in front of four others : सध्या राज्यामध्ये अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामध्ये सोमवारी अशाच एका धक्कादायक अपघाताची घटना मुंबईतील भांडूपमध्ये घडली आहे. ज्यामध्ये एका बसने 13 जणांना चिरडलं. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये मराठी टीव्ही सिरीअलमधील एका बालकलाकाराच्या डोळ्यादेखत तिच्या आईचा करूण अंत झाला आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी अनेक लोक आपल्या कामाच्या ठिकाणाहून परतत असताना भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या बसस्थानकाबाहेर बसची वाट पाहत उभे होते. यावेळी एका इलेक्ट्रीक बसच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे या सुसाट वेगात असलेल्या बसने उभे असलेल्या तब्बल 13 जणांना उडवलं. या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामघ्ये मराठी मनोरंजन विश्वाला देखील हळहळ लागणारी घटना घडली ती म्हणजे या अपघातामध्ये पूर्वा रासम या 11 वर्षीय बालकलाकाराच्या आईचा तिच्या डोळ्या देखत मृत्यू झाला आहे.
मोठी बातमी; महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पूर्वा रासम आणि तिची आई प्रणिता या दोघी अंधेरीमधून शुटींग आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडला. त्या रात्री साडेनऊच्या सुमारास 606 क्रमांकच्या बसची वाट पाहत उभ्या होत्या तेव्हाच त्यांना या बसने उडवलं पण त्यात पूर्वा दूर फेकली गेल्याने ती बचावली मात्र तिच्या आईचा दुर्दैवी अंत झाला आहे.
महापालिका निकालाआधीच कल्याणमध्ये भाजपचा सलग दुसरा विजय; आज होणार घोषणा?
पूर्वाच्या आईवर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पूर्वाने आईच्या मृ्त्यू आणि तो देखील काहीही चूक नसताना झालेला अपघात यावर टाहो फोडून रोष व्यक्त केला. ती म्हणाली की, या इलेक्ट्रीक बसचा आवाज येत नाही. त्यामुळे ही बस मागून आल्याचं आम्हाला कळालं नाही. कळालं असतं तर हा अपघात टळला असता. माझी आई गेली नसती. पण आता माझी आई परत कधीच येणार नाही. त्यामुळे या बसने असे कुणाचे बळी घेऊ नये त्यासाठी या बस बंद करा असं संताप तिने व्यक्त केला…
