Sholay: शोले हा सिनेमा अनेक चाहत्यांचा फेवरेट सिनेमा आहे. या सिनेमामधील सर्वच गाणे आणि अॅक्शन सीन्सने चाहत्यांची कायम मनोरंजन (Entertainment) केले आहे. ‘कितने आदमी थे?’ ते ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’, ‘पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’’बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’ अशा हटके डायलॉग्सला चाहत्यांची नेहमीच मनोरंजन केले आहे. नुकताच शोले या सिनेमाच्या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडीओ एआयचा वापर करुन तयार करण्यात आला सांगितले जात आहे. शोले सिनेमाच्या धुमाकूळ घालत असलेला या व्हिडीओवर लिहिले आहे की, जर ‘शोले’ची निर्मिती जर हॉलिवूडमध्ये झाली असती तर? या व्हिडीओमध्ये हॉलिवूड (Hollywood) अभिनेता रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका बिग बी यांनी साकारलेल्या जय या भूमिकेमध्ये दिसून आला आहे तर अभिनेता अल पचिनो (Al Pacino) हा धर्मेंद्र (Dharmendra) यांनी साकारलेल्या वीरू या भूमिकेमध्ये दिसून आला आहे.
तसेच या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स ही हेमा मालिनी यांनी साकारलेल्या ‘बसंती’ या भूमिकेमध्ये दिसून आली आहे. तसेच अभिनेता केविन स्पेसी हा ठाकूर बलदेव सिंहच्या भूमिकेमध्ये दिसून आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलच धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
१९७५ मध्ये शोले हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. रमेश सिप्पी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात बिग बी, हेमा मालिनी, धर्मेंद्र, संजीव कुमार, ए.के. हंगल, जया भादुरी, सत्येन कप्पू आणि अमजदखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमातील ‘ये दोस्ती हम नाही तोडेंगे, जब तक है जान आणि मेहबूबा मेहबूबा’ या गाण्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.
तसेच अनेक चाहते आज देखील हा सिनेमा अतिशय आवडीने बघत असल्याचे दिसून येत असतात. या सिनेमामधील कलाकारांच्या अभिनयाचे कायम कौतुक होत असताना दिसून येत असतात. शोले हा सिनेमा बॉलिवूडमधील एक आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जात असतो.