Fighter box office collection : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) व अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)एरिअल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ (fighter)25 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यापासून जबरदस्त कमाई सुरु केली. आता सिद्धार्थ आनंदच्या फायटरने अलीकडेच सिनेमांमध्ये महिनाभराचा कालावधी पूर्ण केला आहे. तो चित्रपट अजूनही मोठ्या दिमाखात सुरु आहे. 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून फायटरला ओळख मिळाली. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या या चित्रपटाने जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 360 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
ए एम खानविलकर लोकपालचे नवे अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘आणखी एक संस्था मोदींनी ताब्यात घेतली…’
जगभरातील 360 कोटी ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून फायटर चित्रपटाने देशांतर्गत बाजारातून 259 कोटींहून अधिक कमाई केली. तर विदेशी बॉक्स ऑफिसमधून सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाने 101 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
इंस्टाग्रामवर Marflix Pictures ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, जागतिक स्तरावर मन जिंकणे यालाच म्हणतात. सिध्दार्थ आनंदच्या हिट स्ट्राईकचा विस्तारही सेमी-हिट ते ऑल टाइम ब्लॉकबस्टरपर्यंतच्या 8 बॅक टू बॅक यशांसह केला आहे.
अक्षय- टायगरच्या ‘Bade Miyan Chote Miyan’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं रिलीज
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे निर्मित, फायटर स्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. फायटर आता थिएटरमध्ये आहे. महिनाभरापासून धुमाकूळ घालत आहे.
पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचं कलेक्शन ‘फायटर’ने केलं. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घसरण होताना पाहायला मिळाली. पण अशातच दुसऱ्या शनिवारी ‘फायटर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं.
फायटर चित्रपटाची स्टोरी ही भारतीय हवाई दलामधील शूर सैनिकांच्या जीवनावर आधारित आहे. पुलवामा हल्ला व बालाकोट स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया व दीपिका मीनल राठोडच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच अनिल कपूर हे कॅप्टन राकेश जयसिंह यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत.