अक्षय- टायगरच्या ‘Bade Miyan Chote Miyan’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं रिलीज

अक्षय- टायगरच्या ‘Bade Miyan Chote Miyan’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं रिलीज

Mast Malang Jhoom Song Release: बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” (Bade Miya Chhote Miya) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) मधील दुसरे गाण ‘ मस्त मलंग झूम’ (Mast Malang Jhoom ) हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि बॉलिवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या समावेश पाय-टॅपिंग डान्स मूव्ह असलेलं हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करणार यात शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)


अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायल असून विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिल आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या साउंडट्रॅकमध्ये हे गाणे चार चाँद लावून जाणार आहे. टायगर श्रॉफचा #TigerEffect या गाण्यातून दिसणार आहे.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार: फेब्रुवारी 2023साठी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला असून पूजा एंटरटेनमेंट आणि एफझेड फिल्म्सचे समर्थन आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबतच, चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसणार आहे, जो नुकताच ‘सालार पार्ट वन: सीझफायर’ मध्ये दिसला होता.

Arjun Kapoor: अर्जुन कपूरने इंडस्ट्रीतील करिअरविषयी सोडला मौन, म्हणाला…

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी जवळपास 75 दिवस या चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज