Fighter Box Office Collection Day 16: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ देखील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशा स्थितीत ‘फायटर’च्या (Fighter Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर परिणाम झाला आहे. हृतिक रोशनच्या चित्रपटाने रिलीजच्या 16व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला चला तर मग जाणून घेऊया?
‘फाइटर’ने रिलीजच्या 16व्या दिवशी किती कमाई केली? ‘फायटर’ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटाच्या एरियल ॲक्शनपासून ते हृतिक आणि दीपिका पदुकोण यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. ब्लॉकबस्टर होण्याचे सर्व घटक असूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कामगिरी विशेष झाली नाही. पहिल्या चार दिवसांनंतर जणू काही ‘फायटर’ची क्रेझ प्रेक्षकांच्या मनातून पूर्णपणे निघून गेली होती आणि यासोबतच त्याचा व्यवसायही उतरू लागला होता.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, ‘फाइटर’ने 22.5 कोटींची कमाई केली. यानंतर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 146.5 कोटींची कमाई केली. ‘फायटर’चा दुसऱ्या आठवड्यात 41 कोटींचा व्यवसाय झाला. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे आणि यासोबतच ‘फायटर’च्या तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फाइटर’ ने रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी 1.75 कोटी रुपये कमवले आहेत. यासह ‘फायटर’चे 16 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 189.25 कोटी रुपये झाले आहे.
Aamir Khan : आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ची पुढची आवृत्ती लवकरच, शूटिंगलाही सुरुवात
‘फायटर’ने जगभरात किती कमाई केली? ‘फायटर’ जगभरात सातत्याने प्रगती करत आहे. या चित्रपटाने जगभरात 36.04 कोटींचे खाते उघडले. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी चित्रपटाच्या जगभरातील कमाईचे प्रारंभिक आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार ‘फाइटर’ने रिलीजच्या 15व्या दिवशी 4.70 कोटींच्या कलेक्शनसह 325 कोटींचा आकडा पार केला आहे. यासह ‘फायटर’चे जगभरातील एकूण कलेक्शन आता 328.43 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 16व्या दिवशी हा चित्रपट 330 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.