Download App

BO Collection: हृतिक-दीपिकाचा धुमाकूळ, वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत मोठी उसळी

Fighter Box Office Day 10: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. देशभक्तीने भरलेल्या सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) एरियल ॲक्शन चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक विक्रम मोडेल असे वाटत होते. पण पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण सुरू झाली आणि दुसऱ्या वीकेंडला ‘फायटर’ची अवस्था दयनीय झाली. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे.

‘फाइटर’ बॉक्स ऑफिसवर पुन्हा धूम ठोकला: 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या भारतातील पहिल्या एरियल ॲक्शन चित्रपटाला प्रजासत्ताक दिनाचा पूर्ण लाभ मिळाला. पहिल्याच दिवशी 22.05 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली होती. आता चित्रपटाच्या 10व्या दिवसाचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया फायटरने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे.


आठवड्याच्या शेवटी कमाईत वाढ झाली: Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फाइटर’ने दहाव्या दिवशी 10.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘फायटर’चे 10 दिवसांचे कलेक्शन आता 162.75 कोटींवर पोहोचले आहे. जर चित्रपटाची हीच गती कायम राहिली तर लवकरच दीपिका आणि हृतिकचा ‘फायटर’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

Saqib Saleem: साकिब सलीमने रचला इतिहास, पटकावला ‘पॉवरहाऊस परफॉर्मर’चा पुरस्कार

चित्रपटाची स्टार कास्ट: चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका आणि हृतिक व्यतिरिक्त, फायटरमध्ये अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षयओबेरॉय, ऋषभ साहनी आणि संजीदा शेख सारखे दिग्गज कलाकार आहेत. चित्रपटात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाच्या भूमिकेत दिसत आहे, तर दीपिकाने स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारली आहे.

पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असलेल्या हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची धमाकेदार केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा मल्टीस्टारर चित्रपट वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहे. ‘फाइटर’च्या सिक्वेलचीही चर्चा आहे. खरं तर, पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, दिग्दर्शक म्हणाला होता की ‘जर लोकांना चित्रपट आवडला तर आम्ही त्याचा दुसरा भाग नक्कीच बनवू.’

follow us

वेब स्टोरीज