Fighter OTT Release: थिएटरमध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘फाइटर’ (Fighter Movie ) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटीवर (OTT )देखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाला अनेक मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरून मोठमोठ्या ऑफर मिळाल्या आहेत, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा नेटफ्लिक्ससोबत (Netflix)करार झाला आहे. हा करार छोटा नसून 150 कोटी रुपयांचा असल्याची माहिती मिळाली.
हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनापूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि 300 कोटींहून अधिक कमाई केली. आता हा चित्रपट थिएटरमध्ये सुस्त झाला आहे पण होळीच्या निमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रंग पसरवण्यासाठी सज्ज आहे.
फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी केले आहे, हा चित्रपट 250 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला असून त्याने 211 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिट झाला नाही पण आता चित्रपटाचा ओटीटीवर नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने चित्रपटाचे हक्क 150 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
सई पुन्हा झळकणार OTT वर नव्याकोऱ्या हिंदी वेब सीरिजमध्ये; 2024 ठरतंय खास
2019 मध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित हृतिक आणि दीपिकाचा हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्सबद्दल निर्मात्यांनी अद्याप याची घोषणा केलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर 21 मार्च 2024 पासून उपलब्ध होणार आहे.
फायटरमध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशनशिवाय संजीदा शेख, करण सिंग ग्रोव्हर, अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत, असे असूनही हा चित्रपट हिट झाला नसला तरी ओटीटीवर चित्रपटाला प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे.