सई पुन्हा झळकणार OTT वर नव्याकोऱ्या हिंदी वेब सीरिजमध्ये; 2024 ठरतंय खास

सई पुन्हा झळकणार OTT वर नव्याकोऱ्या हिंदी वेब सीरिजमध्ये; 2024 ठरतंय खास

Sai Tmhankar Upcoming Web Series : अभिनेता-फिल्ममेकर फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन येणार आहेत. ‘डब्बा कार्टेल’ (Dabba Cartel Web Series) असं या आगामी वेब सीरिजचं नाव असून अलीकडेच याचा फर्स्ट लूक समोर आला. ‘डब्बा कार्टेल’ ही मल्टीस्टारर सीरिज असणार असून त्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरही दिसणार आहे. 2024 वर्ष सईसाठी दमदार ओपनिंग करणार ठरलं आहे आणि या वेब सीरिजची पहिली झलक तिने सोशल मीडिया (social media) शेअर केली आहे.

डब्बा कार्टेलची कहाणी ड्रगचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची असून बॉलिवुड मधल्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, सई ताम्हणकर, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अश्या अनेक बड्या कलाकारांची फौज यात बघायला मिळणार आहे. सई आता परत एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी गाजवाणार असल्याची चर्चा सुरु झाली.

सईने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, आता हा असा डबा आहे की त्याला तुम्ही कधी विसरू शकत नाही.” दरम्यान ही सीरिज कधीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सईच्या या पोस्टवर सीरिजची निर्माती शिबानी सोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Shreyas Talpade: ‘गोलमाल 5’ बाबत मोठी अपडेट, खुद्द अभिनेत्याने सांगितलं रिलीज डेट

सईने 2024 या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली असून बॉक्स ऑफिस वर कल्ला करायला ती तयार झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वर्षाची सुरुवात तिने मराठी सिनेमा ‘श्रीदेवी प्रसन्न’ पासून सुरु केली आणि आज पुन्हा एकदा “डब्बा कार्टेल” मधून आता ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय. मराठी प्रेक्षकांना सई आकर्षित करुन घेत असताना आता बॉलिवुड मध्ये सई दमदार परफॉर्मन्स करतेय. आता ती नव्या सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येते, त्यामुळे या वर्षात तिच्या चाहत्यांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज