Shreyas Talpade: ‘गोलमाल 5’ बाबत मोठी अपडेट, खुद्द अभिनेत्याने सांगितलं रिलीज डेट

Shreyas Talpade: ‘गोलमाल 5’ बाबत मोठी अपडेट, खुद्द अभिनेत्याने सांगितलं रिलीज डेट

Shreyas Talpade On Golmaal 5 Hint: अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांच्या फ्रेंचायझीच्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या यादीत ‘गोलमाल 5’ चित्रपटाचेही नाव आहे. ‘गोलमाल’ (Golmaal ) फ्रँचायझी सुपरहिट आहे. या मल्टीस्टारर फ्रँचायझीचे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. ‘गोलमाल 5’ (Golmaal 5 ) संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. पुन्हा एकदा अजय देवगण (Ajay Devgn) आपल्या टीमसोबत चाहत्यांना हसवताना दिसणार आहे. गोपाळपासून तर मानवपर्यंतची व्यक्तिरेखा अनेकांना खूप आवडतात.

2020 मध्ये रोहित शेट्टीने एका निवेदनात सांगितले होते की, ‘गोलमाल 5’ वर काम करत आहे. मात्र आता याच दरम्यान चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने नुकतचं एका मुलाखतीत हा चित्रपटाबद्दल मोठी माहिती दिली आहे. श्रेयसने सांगितले की, ‘गोलमाल 5’ चे शूटिंग पुढील वर्षी सुरू केले जाऊ शकते आणि 2025 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

श्रेयसच्या म्हणण्यानुसार, ‘गोलमाल 5’ ची घोषणा कोरोना महामारीच्या दरम्यान करण्यात आली होती. पण नंतर परिस्थितीमुळे संपूर्ण योजनाच बदलावी लागली. गोलमाल आपल्या हृदयाच्या जवळ असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे, तो चित्रपटाच्या सेटवर खूप एन्जॉय करतो. त्याला त्याचे संवादही बोलता येत नव्हते कारणया सिनेमात तो मुखा असल्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे चारही भाग हिट ठरले आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षकही ‘गोलमाल 5’ची वाट पाहत आहेत.

Dabba Cartel : भक्षकनंतर सईची सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला; ड्रग्स स्मगलिंगचा ‘डब्बा कार्टेल’ टीझर रिलीज

श्रेयसनेही कॉमेडी चित्रपटांबाबत आपले मत मांडले. कॉमेडीत बदल झाल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. गोलमाल किंवा हाऊसफुल सारख्या चित्रपटांपूर्वी 2005 मध्ये अनेक मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाले होते. श्रेयार तळपदेच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर तो लवकरच अनोखी गाथ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘वेलकम टू द जंगल’ या मल्टीस्टारर चित्रपटातही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज