Dabba Cartel : भक्षकनंतर सईची सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला; ड्रग्स स्मगलिंगचा ‘डब्बा कार्टेल’ टीझर रिलीज

Dabba Cartel : भक्षकनंतर सईची सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला; ड्रग्स स्मगलिंगचा 'डब्बा कार्टेल' टीझर रिलीज

Dabba Cartel : हिंदीतील भक्षक या सिनेमा गाजवल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) पुन्हा एकदा हिंदीतील एका वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे डब्बा कार्टेल ( Dabba Cartel ) असे या वेब सिरीजचं नाव असून यामध्ये ड्रग्स स्मगलिंगच्या देसी ट्रिक वापरण्यात आलेल्या आहे.

शिवसेनाला २३ जागा मिळाव्या, धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभा लढणार; संजय मंडलिकांचे विधान

ही वेब सिरीजची निर्मिती अभिनेता आणि निर्माता फरान अख्तर यांनी केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी या मुख्य भूमिकेत आहेत. आज ( 29 फेब्रुवारी ) या सिरीजचा फर्स्ट लूक टीझर रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये एक महिलांचा ग्रुप कशाप्रकारे देसी जुगाड वापरून ड्रग्स रॅकेट चालवतो. हे दाखवण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

नेटफ्लिक्स या ओटीपी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर नेटफ्लिक्सच्या यूट्यूब चॅनलवर या सिरीजचा टीझर रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये शबाना आजमी, अंजली धवन, ज्योतिका, शालिनी पांडे गजराज राव यांचे सह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील दिसत आहे.

Nilesh Lanke : महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी? लंकेंनी स्पष्ट बोलून दाखवलं

किसनेच प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे? याबाबत अद्याप निर्मात्याकडून कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही मात्र लवकरच हे सिरीज ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे देखील सांगण्यात येते.

follow us