म्हणून नव्या दिग्दर्शका सोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर !

सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.

Untitled Design 19 1

Untitled Design 19 1

I love working with new directors – Sai Tamhankar! : विविध पध्दतीच्या कार्यपद्धती आणि नव्या वातावरणात काम करण्याचा समृद्ध संपन्न अनुभव मिळतो – अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इंडस्ट्रीतील नव्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव शेयर केला आहे.

क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर कायम नावीन्यपूर्ण आणि विविध पध्दतीच्या भूमिका करताना दिसत असून कामाचं सातत्य जपत तिने आजवर खूप दर्जेदार ताकदीच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिका करताना तिला भक्कम साथ देणाऱ्या तिच्या सई लवकरच “तुंबाडची मंजुळा” या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.

नवोदित दिग्दर्शक आणि कलाकारासोबत तिने बॉलिवुड आणि मराठीत देखील उत्तम प्रोजेक्ट्स केले असून बहुचर्चित मटका किंग मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे तर डब्बा कार्टेल – हितेश भाटिया, अग्नी – राहुल ढोलकीया ग्राउंड झीरो – तेजस प्रभा विजय देवोस्कर, मिमी – लक्ष्मण उतेकर अश्या उत्तम दिग्दर्शकासोबत प्रोजेक्ट्स केले आहेत.

अनेक बड्या आणि नामांकित बॉलिवूड आणि मराठी दिग्दर्शकासोबत आजवर काम केल्या नंतर सई लवकरच “तुंबाडची मंजुळा” चित्रपटाचा भाग होणार आहे. या चित्रपटात देखील तिने एका नव्या दिग्दर्शकासोबत काम केलं असून नवीन दिग्दर्शक नव्या लोकासोबत काम करण्याबद्दल सई सांगते ….

भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?

“नवीन व्यक्तीसोबत आणि त्यांच्या पहिल्या प्रकल्पासाठी काम करण हे नेहमीच खास असतं आणि यामुळे मला नेहमी ही जाणीव अधिक ठळकपणे होते की जेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होते तेव्हा अनेक लोकांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. ही भावना खूप प्रेरणादायी आणि सामर्थ्य देणारी असते आणि जर मी तीच भावना त्यांच्या पहिल्या चित्रपटावर काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकले तर ते खरोखरच अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरत.

याशिवाय मला नेहमी वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत, विविध प्रकारच्या वातावरणात काम करायला आवडतं. एखाद्याच्या पहिल्या आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टचा भाग होणे हेही नेहमीच विशेष असतं आणि ती भावना मला खूप आवडते ती समृद्ध करणारी असते. कोणत्याही स्वरूपात नव्या आवाजांना आणि नव्या प्रतिभेला पाठिंबा देण्यात एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मला मिळतं”

सईच्या कामाचं सातत्य आणि तिला मिळणाऱ्या भूमिका या कायम कौतुकास्पद आणि लक्षवेधी ठरल्या असून येणाऱ्या काळात देखील अनेक दर्जेदार कथावर काम करतेय असं कळतंय.

Exit mobile version