IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही ‘हे’ कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा…

IMDb Top Indian Star List: IMDb ची या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (IMDb Stars 2023) या यादीत पहिला क्रमांक पटकावणारा अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आहे. या यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनला आहे. Our special announcement is here! 📣🎉 […]

IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही 'हे' कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा...

IMDb : टॉप 10 भारतीय स्टार्सच्या यादीतही 'हे' कलाकार आघाडीवर, SRK पहिला तर आलियाचा...

IMDb Top Indian Star List: IMDb ची या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (IMDb Stars 2023) या यादीत पहिला क्रमांक पटकावणारा अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आहे. या यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनला आहे.


शाहरुख खानने या वर्षात ‘जवान’ आणि ‘पठाण’ असे दोन मोठे चित्रपट दिले आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) धमाकेदार ठरले आहेत. या चित्रपटालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आणि आता त्याचा फायदा किंग खानला मिळाला आहे. शाहरुख खान या वर्षातील नुंबर एकचा अभिनेता ठरला आहे. शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांनी 1000 कोटींचा व्यवसाय केला. त्याचबरोबर आता शाहरुख खानचा आणखी एक मोठा चित्रपट ‘डंकी’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे, तर दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनीही टॉप 3 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीत आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्रीने यावर्षी दोन चित्रपट केले, त्यापैकी एक करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ होता. हॉलिवूडच्या हार्ट ऑफ स्टोनमध्येही ही अभिनेत्री दिसली होती. या यादीत दीपिका पदुकोणने तिसरे स्थान पटकावले आहे. ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसली होती. सोबतच अभिनेत्री नयनतारानेही या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

Farrey Film Screening: ‘फर्रे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ‘या’ सेलिब्रेटींनी लावली हजेरी

टॉप 10 स्टार्सची संपूर्ण यादी 

शाहरुख खान, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, वामिका गब्बी, नयनतारा, तमन्ना भाटिया, करीना कपूर खान, शोभिता धुलिपाला, अक्षय कुमार, शाहिद कपूर.

Exit mobile version