“गीतरामायण सादर करणाऱ्या गायक, आयोजक लोकांसाठी महत्वाची सूचना.”

गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे याची आपल्याला कल्पना आहे, भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे व गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती,कन्नड, तामिळ अश्या अनेक भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबुजी नावाचा उल्लेख न करता अतिशय वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत (काही लोक आवर्जून उल्लेख करणारे आहेत त्यांचे आभार!), कार्यक्रमाच्या जाहिरातीत, […]

WhatsApp Image 2023 03 16 At 3.45.39 PM

WhatsApp Image 2023 03 16 At 3.45.39 PM

गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे याची आपल्याला कल्पना आहे, भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे व गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती,कन्नड, तामिळ अश्या अनेक भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबुजी नावाचा उल्लेख न करता अतिशय वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत (काही लोक आवर्जून उल्लेख करणारे आहेत त्यांचे आभार!), कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या Backdrop वर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही, हे माडगूळकर कुटुंबियांतर्फे खपवून घेतले जाणार नाही.

तुमच्या प्रत्येक बॅनरवर,कार्यक्रमाच्या backdrop वर “महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गीतरामायण” असा उल्लेख असायलाच हवा तसेच संगीत सुधीर फडके असा उल्लेख असणे आवश्यक आहे.

गीतरामायणाचे Copyrights अजूनही माडगूळकर व फडके (संगीत) कुटुंबीयांकडेच आहेत (२०६२ पर्यंत ते आमच्याकडेच राहतील),ते पब्लिक Domain मध्ये अजून आलेले नाहीत, गदिमांना त्यांचे श्रेय योग्य रीतीने न दिल्यास माडगूळकर कुटुंबियांतर्फे त्या कार्यक्रमावर Copyright कायद्या मार्फत आक्षेप घेतला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता, आशिष शेलारांचा ठाकरेंवरती हल्ला 

आपण आपल्या आई-वडिलांचे नाव, आडनाव अभिमानाने लावतोचन मग ज्या गदिमा व सुधीर फडके यांनी कष्टाने (हो कुठल्याही महाराज अथवा स्वामींच्या कृपेने हे घडलेले नाही) या गीतरामायणाची रचना केली त्यांचा साधा उल्लेख तुम्ही करू शकत नाही याची असे करणाऱ्या लोकांना लाज वाटायला हवी. पुढच्या पिढीला कळायला नको या अलौकिक काव्याची निर्मिती कोणाची आहे?.

तुम्ही कार्यक्रम करण्यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही,गदिमांचे गीतरामायण तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत नेत आहात याचा आम्हाला आनंदच आहे, मात्र गदिमांच्या नावाचा उल्लेख जाहिरातीत व कार्यक्रमात नसल्यास हे खपवून घेतले जाणार नाही,गदिमा व सुधीर फडके यांना त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्यावी, धन्यवाद!

आपले,
माडगूळकर कुटुंबीय

Exit mobile version