Albatya Galbatya Drama : सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी प्रायोगिक, व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात काही विशेष नाटकं रंगभूमीवर येताना दिसत आहेत. ही बालनाट्ये लहान मुलांसोबत थोरा मोठ्यांचंही चांगलं मनोरंजन करताना दिसत आहेत. या यादीमध्ये ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा देखील समावेश आहे. (Drama) या नाटकाने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. आता हे नाटक एक नवा विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज झालं आहे.
BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ आहे रडूबाई; काय आहे कारण?
काय आहे तो विश्वविक्रम?
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करणार आहेत. मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नाटकाचे सलग सहा प्रयोग होणार आहेत. त्यामुळे हे नाटक जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झालं आहे. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर येथे होणार आहेत.
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाविषयी सांगायचे झाल्यास हे नाटक प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देतं. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते. कोरोनाचा काळ सोडला तर ६ वर्षात या नाटकाने ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे आणि विक्रमी १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.
Sharvari Wagh: वेदा माझ्या अस्तित्व आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वपूर्ण फिल्म, अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचललं आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.