BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ आहे रडूबाई; काय आहे कारण?

BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ आहे रडूबाई; काय आहे कारण?

Bigg Boss Marathi New Season Day 6 : ‘रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू’ असं म्हटलं की आता डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar). ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरातील ‘रडूबाई’ यंदाच्या सीझनमधील ‘मालवणी चेडू’ आहे. (Bigg Boss Marathi New Season) नवा सीझन सुरू होऊन काहीच दिवस झाले असून अंकिताचे डोळे शुल्लक कारणाने अनेकदा पाणावलेले दिसून आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


आजच्या भागात अंकिता वालावलकर, आर्या जाधव आणि पुरुषोत्तमदादा पाटील गप्पा मारत आहेत. त्यावेळी आर्या म्हणते,”मी कालपर्यंत शांतच होते”. त्यावर रडत-रडत अंकिता तिला म्हणते,”तुला माहिती आहे का? मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. मी भांडी घासत नाही. त्यावर आर्या पुढे तिला म्हणते की यापुढे मी भांडी घासेन. यावर अंकिता म्हणते, मला भांडी घासायची आहेत… मला माझ्या वीक पॉईंटवर काम करायचं आहे. मी भांडी घासत नाही हे माझ्या घरच्यांनाही माहिती आहे. जिथे आपल्याला भांडणं दिसतात ना तिथून लांब जायचं. भांडण नाही करायचं. आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. पण समोरचा व्यक्ती अती करत असेल तर आपण शांत राहिलं पाहिजे”.

इरिना सूरजला म्हणाली, “बकरी”

आजच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण इरिनाला डान्स करायलादेखील लावतो. त्यानंतर इरिना सूरजसारखा डान्स करताना दिसेल. पुढे इरिना सूरजला ‘बकरी’ म्हणते. त्यावर सूरज तिला “मी शेर आहे” असं म्हणतो. त्यावर इरिना त्याला “मी किंग कोब्रा आहे” असं म्हणते. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube