Download App

IND vs AUS Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का अन् विराटच्या ‘त्या’ फोटोची जोरदार चर्चा !

Virat Kohli Anushka Sharma Video Viral : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. हा सामना हरल्यानंतर विराट कोहलीपासून (Virat Kohli) रोहित शर्मा भावूक झाले होते. दरम्यान, सध्या एक फोटो सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे, यामध्ये विराटला अनुष्काने कडकडून मिठी मारली आहे.


अनुष्काने विराटला मिठी मारली
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विराट कोहलीला मिठी मारताना दिसत आहे. फोटोमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर खूपच भावूक झाल्याचे दिसत आहे, हे पाहून चाहते देखील नाराज झाले आहेत. सध्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

एका यूजरने लिहिले- या दोघांनी ‘आम्ही एकत्र आहोत’ हे सिद्ध केले आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले – ‘अनुष्काने विराटला ज्या प्रकारे सपोर्ट केला तो खरोखरच हृदय जिंकणारा आहे’. आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘प्रत्येकाला अनुष्कासारख्या जीवनसाथीची गरज आहे, जो तुमच्या सुख-दु:खात नेहमी तुमच्यासोबत असेल, विराट कोहली खूप भाग्यवान आहे’.

“हरल्यानंतर जिंकतो त्याला बाजीगर…”, भारताच्या पराभवानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची पोस्ट चर्चेत

विराटने उपांत्य फेरीत आपले 50 वे शतक पूर्ण 
फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला होता, यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा जास्त धावा करून चषक जिंकला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाने उत्तम कामगिरी केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. याआधी उपांत्य फेरीत विराट कोहलीने आपले 50 वे शतक पूर्ण केले होते, ते पाहून अनुष्का शर्मा खूप खूश झाली होती. तर मोहम्मद शमीने ७ विकेट घेत इतिहास रचला होता.

यावेळी, अनुष्का शर्मा व्यतिरिक्त शाहरुख खान देखील त्याच्या कुटुंबासह वर्ल्ड कप 2023 सामना पाहण्यासाठी आला होता. त्याचवेळी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, आशा भोसले यांसारख्या अनेक स्टार्सनीही या सामन्यात भारताचा जयजयकार केला.

Tags

follow us