Prakash Raj on India -Bharat : सध्या संपूर्ण देशात भारत (Bharat ) विरुद्ध इंडिया (India ) यावरून चांगलाच वाद पेटला आहे. या सगळ्यामध्ये 9 आणि 10 सप्टेंबर दिवशी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी २० समितीमध्ये (G20 Committee) परदेशातील अनेक नेते देखील सहभाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Social media) राजकारणी लोकांबरोबर सेलिब्रिटी देखील जी २० चे आमंत्रण पाठवण्यात आला आहे.
परंतु सध्या वाद याच्यावरून सुरु आहे की आमंत्रण पत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिण्यात आले आहे. आमंत्रण पत्र बघितल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी असं म्हणणं सुरु केलं आहे की, केंद्र सरकारला देशाचे नाव इंडियाच्या जागी भारत करायचे आहे. यावर बिग बी, जॅकी श्रॉफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. परंतु आता दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील प्रतिक्रिया दिल्याचे बघायला मिळत आहे.
You can only change names with FEAR .. we INDIANS can change YOU and Your GOVERNMENT… with PRIDE . #INDIA #justasking https://t.co/VlnjNg25vf
— Prakash Raj (@prakashraaj) September 6, 2023
बिग बी (Amitabh Bachchan) यांच्यानंतर प्रकाश राज आता त्यांची या सगळ्यावर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, ‘तुम्ही घाबरून फक्त नाव बदलू शकतात… आम्ही भारतीय न घाबरता तुम्हाला आणि तुमच्या सरकारला बदलू शकणार आहे #इंडिया.’
Nikhil Bhambri: अभिनेता निखिल भांबरी करतोय ‘या’ नव्या प्रोजेक्टची तयारी!
तसेच बिग बी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. बिग बी यांनी देखील ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पोस्टमध्ये फक्त ‘भारत माता की जय’ असे म्हटले होते. बिग बी यांचे हे ट्वीट बघितल्यावर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत बिग बी देशाचं नाव बदलण्यासाठी त्यांची संमती देत असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर बिग बी यावर काहीही स्पष्ट न बोलता हे ट्वीट केल्यानं सगळ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्याचे बघायला मिळालं होत.