आजचा दिवस भारतासाठी खूप आनंदाचा आहे. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणईत भारतातून नामांकन मिळालेल्या द एलिफंट व्हिस्पर्सने (The Elephant Whispers) बाजी मारली. निर्माते गुनीत मोंगा (Gunit Monga) यांच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ याची निर्मीती केली होती. द एलिफंट व्हिस्पर्स हा नेटफ्लिक्सचा माहितीपट आहे. याचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस (Kartiki Gonsalves) यांनी केले आहे. या माहितीपटाची कथा अनाथ असलेला हत्ती आणि त्याची देखभाल करणारा यांच्यातील अतूट बंधाबद्दल बोलते.
'The Elephant Whisperers' wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/WeiVWd3yM6
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
गुनीत मोंगा यांची प्रतिक्रिया
ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीत मोंगाने यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्कर अवॉर्ड हातात घेऊन त्यांनी आपला फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले- ‘आजची रात्र ऐतिहासिक आहे. कारण निर्मितीसाठी हा भारताला मिळालेला पहिलाच ऑस्कर आहे. धन्यवाद आई-बाबा, गुरुजी शुक्राना, माझे सह-निर्माते अचिन जैन, नेटफ्लिक्स, आलोक, सराफिना, डब्ल्यूएमई बॅश संजना. ही कथा पाहणाऱ्या सर्व महिलांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद कार्तिक… भविष्य येथे आहे. जय हिंद.’
कथा काय?
या लघुपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, या माहितीपटाचे कथानक हे दक्षिणेतील बोमन आणि बेबी हे जोडपं, तसेच एक हत्तीभोवती फिरते. एका अनाथ हत्तीची काळजी घेण्यासाठी, एक कुटुंब आपले जीवन कसे समर्पित करते हे या कथेत दाखवण्यात आले आहे.
प्रियांका चोप्राने केले होते कौतुक
द एलिफंट व्हिस्पर्स ऑस्कर 2023 साठी नामांकन झाल्यानंतर प्रियांका चोप्राने द एलिफंट व्हिस्पर्सचे खूप कौतुक केले होते. प्रियांकाने लिहिले होतं की, ‘भावनांनी गच्च भरलेला एक ट्रंक. मी नुकताच पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी माहितीपटांपैकी एक असलेला द एलिफंट व्हिस्पर्स… मला खूप आवडला. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे खूप खूप अभिनंदन…. अशा शब्दात प्रियकांने कौतूक केले होते.