Download App

Sonakshi Zaheer Wedding: सोनाक्षी-जहीरचा ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडिओची चर्चा

Sonakshi-Zaheer : सोनाक्षी सिन्हा ही आपला प्रियकर झहीर इक्बालसोबत विवाहबद्ध झाली आहे. या जोडप्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला.

Sonakshi Zaheer Wedding Reception Video: सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal)यांनी 23 जून रोजी एकमेकांशी लग्न केले. नोंदणीकृत विवाहानंतर सोनाक्षी आणि झहीर आता पती-पत्नी बनले आहेत. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे अनेक सुंदर व्हिडिओ एकापाठोपाठ एक व्हायरल (Viral Video) होत आहेत, यामध्ये हे कपल लग्नानंतर किती आनंदी आहेत हे बघायला मिळत आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नातील केक कापतानाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षीने लाल रंगाची साडी घातलेली दिसत आहे. केक कापण्याआधीच्या व्हिडिओमध्ये झहीर खान सोनाक्षीसाठी रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.


सोनाक्षीसाठी झहीर झाला रोमँटिक

व्हिडिओमध्ये तुम्ही झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा केक कटिंगसाठी तयार असल्याचे पाहू शकता. केक कापण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हाच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ या गाण्यावर या कपलने रोमँटिक डान्स केला आहे. या गाण्यावर डान्स करताना सोनाक्षी सिन्हाही झहीरला सपोर्ट करत आहे आणि डान्स केल्यानंतर दोघांनी केक कापला.

लग्नासाठी 23 जून का निवडला?

लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करताना सोनाक्षी सिन्हाने सांगितले होते की, तिने लग्नासाठी 23 जूनची निवड का केली? तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लग्नाचे फोटो शेअर करताना सोनाक्षीने सांगितले की, सात वर्षांपूर्वी 23.06.2017 रोजी दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले होते आणि ते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनीही सर्व आव्हाने आणि अडचणींवर मात करत शेवटच्या क्षणांपर्यंत येऊन पोहोचले आहे.

सोनाक्षी आणि झहीर अडकले विवाह बंधनात, मोजक्याच नाईवाईकांच्या उपस्थितीत झाला सोहळा, पाहा फोटो

सोनाक्षी सिन्हाने ऑफ व्हाईट साडीत लग्न केले

लग्नासाठी सोनाक्षी सिन्हाने ऑफ-व्हाइट साडी आणि अतिशय हलके दागिने घातले आहे. तिने तिचे केस एका बनमध्ये बांधले होते आणि त्यावर पांढरे गुलाब लावलेलं होते. त्याचबरोबर झहीर इक्बालनेही पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. झहीर इक्बालच्या वडिलांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत आधीच सांगितले होते की हे लग्न हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाजानुसार होणार नाही. हा कोर्ट मॅरेज असेल. यासोबतच झहीरच्या वडिलांनीही सोनाक्षी सिन्हाचे धर्मांतर करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते, “ती धर्मांतर करत नाहीये आणि ते निश्चित आहे.” त्यांचे संघटन हे अंतःकरणाचे संघटन आहे आणि त्यात धर्माची भूमिका नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू देवाला देव म्हणतात आणि मुसलमान देवाला अल्ला म्हणतात. पण दिवसाच्या शेवटी, आपण सर्व मानव आहोत. माझे आशीर्वाद झहीर आणि सोनाक्षीला आहेत. अशी पोस्ट अभिनेत्याने केले आहे.

follow us