Download App

ईशान खट्टर म्हणजे ‘जेन झी’चा मिलिंद सोमण; अत्यंत मिळत्या-जुळत्या आहेत ‘या’ गोष्टी

Ishaan Khattar ने त्याच्या हॉटनेसने महिलांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ईशान हा जनरेशन झेडचा मिलिंद सोमन असल्याचं बोललं जात आहे.

Ishaan Khattar is the Milind Soman of Gen Z : नेटफ्लिक्स या ओटीपी प्लॅटफॉर्मच्या द रॉयल्समध्ये झळकलेल्या ईशान खट्टरने त्याच्या हॉटनेसने महिलांना भुरळ घातली आहे. त्यामुळे ईशान हा जनरेशन झेडचा मिलिंद सोमण असल्याचं बोललं जात आहे. असं एका लेखात द प्रिंट या वृत्तपत्राने विश्लेषण केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या शर्टलेस फोटोवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. या अगोदर तीन दशक पहिले मिलिंद सोमणच्या मेड इन इंडिया म्युझिक व्हिडिओमध्ये केवळ पांढऱ्या धोत्रामध्ये लाकडाच्या एका बॉक्समध्ये बाहेर आलेल्या व्हिडिओने धुमाकूळ घातला होता.

शिवराज दिवटेचा सरपंच संतोष देशमुख करायचा होता ? आता बीड पुन्हा पेटले !

हा तो काळ होता. ज्यावेळी न मोबाईल होता ना इंटरनेट केवळ केबल टीव्ही असतानाही महिलांसह सर्व प्रेक्षकांवर त्याने छाप टाकली होती.त्याचप्रमाणे आता ईशानसाठी देखील महिला फॅन फॉलोविंग वाढू शकतो. त्यामुळे मिलिंद सोमणचा वारसा पुढे चालवण्यासाठी ईशान अगदी योग्य मानला जात आहे. याची कारण पाहूयात… 1989 मध्ये मिलिंद सोमणने त्याच्या मॉडलिंग करिअरला सुरूवात केली. त्यात त्याने महिलांना प्रचंड भूरळ घातली.

अमलपट्टी धरण उंचीवाढ प्रश्नावर सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक; ‘निर्णय घ्या अन्यथा.. सतेज पाटीलही भडकले

त्यानंतर त्याच्या मधु सप्रेसोबतच्या स्निकर्सच्या जाहिरातीने वाद घातला आणि सोमणने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. यात मिलिंद सोमण आणि मधु सप्रेच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यांना दोघांना एका अजगराने वेढा घातलेला होता. तर जाहिरात करण्यासाठी त्यांनी पायात केवळ स्निकर्स घातलेले होते. या सर्व प्रसिद्धिच्या आलेखानुसार सोमण एका झटक्यात प्रसिद्धीच्या झोतात आला. तसा ईशान खट्टर हा गेल्या काही वर्षांत हळू-हळू प्रसिद्धीच्या झोतात आला.

आम्ही तुझ्या पाठिशी आहोत, तु घाबरू नको; मनोज जरांगेंनी दिला शिवराज दिवटेला धीर.. अन्..

मीरा नायरच्या द सुटेबल बॉय या चित्रपटातून ईशानने प्रेक्षकांना प्रभावित केलं. त्यानंतर तब्बूसोबत अभिनय करत त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप गडद केली. त्यानंतर 2024 मध्ये आलेला मर्डर मिस्ट्री चित्रपट परफेक्ट कपलमध्ये ईशानने स्विमिंग पूलमधून बाहेर येत आपल्या हँडसमनेसची जादू पसरवली. त्यानंतर द डर्टी मॅक्झिनच्या कव्हर पेजवर ईशानने केवळ रेतीने अर्धवट झाकलेल्या आपल्या सिक्स पॅक आणि आकर्षक शरीराने लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता ईशान द रॉयल्समध्ये प्रिन्स अभिराज सिंह ही भूमिका साकारणार आहे. तर याच शोमध्ये मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हे त्याच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तसेच रियल लाईफमध्ये देखील ईशान हा मिलिंद सोमणचा खरा वारसदार मानला जात आहे.

follow us