Israel Palestine Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष (Israel Palestine Conflict) वाढत चालला आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये घुसून लोकांच्या खुलेआम कत्तली केल्या. महिलांचं अपहरण केलं. आताही येथे यु्द्ध सुरुच आहे. इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेनेही इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेतली आहे. या युद्धाचे जगालाच हादरे बसत असतानाच भारतातही या युद्धाची मोठी चर्चा सुरू आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
Israel Palestine Conflict : युद्ध चिघळलं! इस्त्रायलसाठी अमेरिका मैदानात; हमासच्या कमांडरला उचललं
स्वराने या युद्धावर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. या युद्धात तिने चक्क पॅलेस्टाइनचे समर्थन केले आहे. स्वरा भास्करने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे, की जेव्हा इस्त्रायलने पॅलेस्टिनींवर हल्ला केला तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. इस्त्रायलने पॅलेस्टिनींवर हल्ला करत त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांची घर उद्धवस्त केली आणि जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांनी पॅलेस्टिनींच्या मुलांना आणि तरुणांना देखील सोडलं नाही. गाझावर सतत 10 वर्षे हल्ले केले, बॉम्ब फेकले. म्हणून मला इस्त्रायलवरील हल्ल्यावर शोक व्यक्त करणाऱ्या लोकांचे हे कृत्य पांखडी म्हणजे ढोंगीपणासारखे वाटते.
या पोस्टनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. तसेही तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कायमच तिला ट्रोल करत असतात. तिच्या पोस्टवर संतापही व्यक्त करतात. आताही तिने या युद्धात पॅलेस्टाइनचे समर्थन केल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
दरम्यान, या युद्धात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाची सर्वात मोठी किंमत लहान मुले आणि महिलांना चुकवावी लागत आहे. हमासच्या अतिरेक्यांनी अनेक इस्त्रायली महिलांंचं अपहरण केलं आहे. तसेच त्यांनी काही जणांच्या हत्याही केल्या आहेत. युद्धाचा हा प्रसंग त्यांच्यासाठी घातक ठरत आहे.
इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष तीव्र, आतापर्यंत १ हजार नागरिकांचा मृत्यू, रॉकटे हल्ले सुरूच
इस्त्रायलच्या सैन्याने हमासच्या नौदल कमांडरला ताब्यात घेतलं आहे. या कमांडरच्या ब्रिगेडनेच इस्त्रायली म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलच्या हवाई दलाने त्याच्यावर बॉम्ब टाकले होते. येथेच राहून हमासचे मोठे कमांडर युद्धाचे नेतृत्व करत होते. या युद्धात दहशतवादी संघटनेच्या अनेक ऑपरेशनल मुख्यालयांवर बॉम्ब टाकण्यात आले. हमासच्या कमांडरच्या ठिकाणांवर देखील बॉम्ब टाकण्यात आले. यानंतर इस्त्रायली सैन्याने नौदलच्या कमांडरला ताब्यात घेतले.