Israel Palestine Conflict : युद्ध चिघळलं! इस्त्रायलसाठी अमेरिका मैदानात; हमासच्या कमांडरला उचललं

Israel Palestine Conflict : युद्ध चिघळलं! इस्त्रायलसाठी अमेरिका मैदानात; हमासच्या कमांडरला उचललं

Israel Palestine Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष (Israel Palestine Conflict) अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरूच आहेत. आता इस्त्रायलने आक्रमक भूमिका घेत हमासचे कंबरडे मोडण्याचा प्लॅन आखला आहे. हमासचे अतिरेकी इस्त्रायलमध्ये शिरले. त्यांनी येथे खुलेआम कत्तली सुरू केल्या. महिलांचं अपहरण केलं. परिस्थिती चिघळत असताना आता इस्त्रायलने प्रतिहल्ले सुरू केले आहेत. हमास प्रमाणेच लेबनॉननेही इस्त्रायलवर हल्ले सुरू केल्याने युद्ध अधिकच चिघळलं आहे. यामुळे आता मित्र राष्ट्रांनी इस्त्रायलसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेने इस्त्रायलसाठी मदतीची मोठी घोषणा केली आहे.

Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर त्यांनी भूमध्य समुद्रात युद्धनौकांचा ताफा पाठवला. अमेरिकेने एफ 35, एफ 15 आणि एफ 16 या लढाऊ विमानांनाही अलर्ट मोडवर ठेवलं आहे. या युद्धात चारअमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने युद्ध लवकर समाप्त होईल याची शक्यता मावळली आहे. रशिया युक्रेन युद्धातही अमेरिका आणि अन्य देशांची एन्ट्री झाल्याने दोन वर्षे होत आली तरी या युद्धाचा निकाल लागलेला नाही.

आमच्यावरील हा हल्ला 9/11 सारखाच

इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात अमेरिकेवर ज्या प्रमाणे 9/11 हल्ला झाला. त्याच प्रकारचा हा इस्त्रायलवरचा हल्ला आहे, असे म्हटले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेट यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट करत निवेदन जारी केले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. आता तर युद्ध अधिकच भडकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण,  युद्धात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे. आणि प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

हमासचा कमांडर इस्त्रायलच्या ताब्यात

इस्त्रायलच्या सैन्याने हमासच्या नौदल कमांडरला ताब्यात घेतलं आहे. या कमांडरच्या ब्रिगेडनेच इस्त्रायली म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलच्या हवाई दलाने त्याच्यावर बॉम्ब टाकले होते. येथेच राहून हमासचे मोठे कमांडर युद्धाचे नेतृत्व करत होते. या युद्धात दहशतवादी संघटनेच्या अनेक ऑपरेशनल मुख्यालयांवर बॉम्ब टाकण्यात आले. हमासच्या कमांडरच्या ठिकाणांवर देखील बॉम्ब टाकण्यात आले. यानंतर इस्त्रायली सैन्याने नौदलच्या कमांडरला ताब्यात घेतले.

Israel Attack : रात्रभर हल्ले सुरुच; 300 लोकांचा मृत्यू, साडेतीन हजार जखमी

एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचा बळी

दरम्यान, या युद्धात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाची सर्वात मोठी किंमत लहान मुले आणि महिलांना चुकवावी लागत आहे. हमासच्या अतिरेक्यांनी अनेक इस्त्रायली महिलांंचं अपहरण केलं आहे. तसेच त्यांनी काही जणांच्या हत्याही केल्या आहेत. युद्धाचा हा प्रसंग त्यांच्यासाठी घातक ठरत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube