Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला

Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला

Israel Hamas War : हमास दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Hamas War) केल्यानंतर आता या देशावरील संकटात आणखी वाढ झाली आहे. या संकटाचा फायदा घेत आता लेबनॉननेही इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ला चढवला आहे. त्यानंतर इस्त्रायलनेही सावध होत लेबनॉनवर हल्ला करत प्रत्युत्तर दिले आहे. टाइम्स ऑफ इस्त्रायलने याबाबत वृत्त दिले आहे. लेबनॉनमधील हेझबुल्ला दहशतवादी गटाकडून रॉकेट आणि शेल्स इस्त्रायलच्या वादग्रस्त भागात सोडण्यात आले. या हल्ल्याने देशातील परिस्थिती आणखीनच चिघळली असून युद्धाचा भडका वाढतच चालला आहे.

Israel Attack : इस्त्रायलमध्ये अडकली नुसरत भरुचा; टीमचा संपर्क होत नसल्याने वाढलं टेन्शन

इस्त्रायलने शनिवारी हल्ला झाल्यानंतर स्टेट ऑ वॉर घोषित केले आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. शनिवारचा दिवस आणि रात्रभर हल्ले सुरुच होते. या हल्ल्यात आतापर्यंत पाचशे नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर हजारोंच्या संख्येने जखमी झाले आहेत. घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या ढिगाऱ्याखाली आणखीही लोक अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी रात्रभर हल्ले सुरुच

इस्रायलमधील (Israel Attack) परिस्थिती स्फोटक बनली आहे. हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel) हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रभर इस्त्राएलमध्ये हल्ले सुरुच होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून आता मृतांचा आकडा 300 झाला आहे. तर तब्बल 3500 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर हमासने अनेक इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवले तर काही जणांच्या हत्या केल्याचेही समोर आले आहे. यानंतर इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्हिडिओ संदेश जारी करत हमासला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला होता.

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून रॉकेट हल्ला केला. इस्त्रायलच्या हद्दीत दोन तासांत 5,000 हून अधिक रॉकेट डागण्यात आले. अनेक दहशतवाद्यांनीही घुसखोरी केली. इस्त्रायल सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी शनिवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या हल्ल्यात आतापर्यंत किमान 300 हून अधिक बळी गेले.

Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube