Israel Attack : इस्त्रायलमध्ये अडकली नुसरत भरुचा; टीमचा संपर्क होत नसल्याने वाढलं टेन्शन

Israel Attack : इस्त्रायलमध्ये अडकली नुसरत भरुचा; टीमचा संपर्क होत नसल्याने वाढलं टेन्शन

Israel Attack : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Israel Attack) हिंदी चित्रपटसृ्ष्टीतून काळजीत टाकणारी बातमी समोर येत आहे. इस्त्रायलमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. नेमक्या याच वेळी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्य टीममधील एका सदस्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर या देशात कामानिमित्त गेलेले भारतीय नागरिकही येथे अडकून पडले आहेत.  दरम्यान, सध्या अभिनेत्री भरुचा हिच्याशी संपर्क होत नसला तरी तिला भारतात सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे तिच्या टीमकडून सांगण्यात आले.

Israel Attack : रात्रभर हल्ले सुरुच; 300 लोकांचा मृत्यू, साडेतीन हजार जखमी

नुसरत हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्त्रायलला गेली होती. मात्र येथे शनिवारपासून युद्ध सुरू झाले आहे. शनिवारी दिवस आणि रात्रभर हल्ले सुरुच होते. देशभरातील दळणवळणांच्या साधनांवरही या युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यात आता अभिनेत्री भरुचा येथे अडकून पडली आहे. आता तिच्याशी संपर्क होत नसल्याचे तिच्या टीममधील सदस्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. शनिवारी दुपारी तिच्याशी संपर्क झाला होता. त्यावेळी तेथील एका बेसमेंटमध्ये ती सुरक्षित होती. त्यानंतर मात्र संपर्क होऊ शकला नाही.

आता तिच्याशी संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ती परत भारतात येईल असेही तिच्या टीमकडून सांगण्यात आले. यानंतर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. परंतु, या देशातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस

शनिवारी रात्रभर हल्ले सुरुच

इस्रायलमधील (Israel) परिस्थिती स्फोटक बनली आहे. शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. या रॉकेट हल्ल्यात (Rocket Attack ) आतापर्यंत बळी गेलेल्यांचा आकडा 300 च्या पुढे गेला आहे. तर 3500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. तर काही जणांची हत्या करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. येथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. शनिवारी दिवस आणि रात्रभर दोन्ही बाजूंनी हल्ले सुरुच होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube