Download App

आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक सॅंड्रीन बोनेअरच्या स्लो जोचं निमित्त; जॅकी श्रॉफ दिसणार मुख्य भूमिकेत

Jacky Shroff बहुप्रतिक्षित बायोपिक स्लो जोमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसणार. तर सँड्रीन बोनेअरचे दिग्दर्शनात पदार्पण

Jacky Shroff in lead role in Sandrine Bonaire’s slow jo : सिंगापूर प्रोडक्शन हाऊस हेजलनेट मीडियाचे सह सीईओ असलेल्या इसाबेला श्रेयाशी सेन आणि ऑलिव्हर डॉक यांच्याकडून बहुप्रतिक्षित बायोपिक स्लो जोची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ ( Jacky Sroff ) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटातून प्रसिद्ध फ्रान्स अभिनेत्री सँड्रीन बोनेअर ( Sandrine Bonaire ) या दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

‘शरद पवारांच्या PA ने माझ्या विरुद्ध मतदान करायला सांगितलं’; तटकरेंचा गौप्यस्फोट

हा चित्रपट दिवंगत भारतीय संगीतकार जोसेफ मॅनुअल दा रोचा ज्यांना प्रेमाने स्लो जो या नावाने ओळखले जात होतं त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना सेन आणि डॉक यांनी सांगितलं की, या चित्रपटाला स्क्रीनवर आणण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सॅंड्रीन करणार असून जॅकी श्रॉफ यामध्ये मुख्य भूमिकेत असल्याचाही आम्हाला अत्यंत आनंद आहे.

… म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट

बोनेअरचं दिग्दर्शन कौशल्य आणि जॅकी श्रॉफ यांचा मॅग्नेटिक अभिनय यामुळे स्लो जो यांची ही कथा अत्यंत मार्मिक आणि उत्तम होणार आहे. तसेच स्लो जो यांचा वारसा देखील मोठा आहे. तर या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं की, या चित्रपटात काम करण्यासाठी मी देखील अत्यंत उत्साही आहे. ज्यामध्ये सर्वच गोष्टी एखाद्या पर्वणी सारख्या आहेत. त्या म्हणजे बोनेअरचं दिग्दर्शन, स्लो जो यांची ही कथा आणि सेन आणि डॉक यांची निर्मिती. अशी प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली.

follow us

संबंधित बातम्या