Download App

Jacqueline Fernandez Post: गणपत’साठी जॅकलिन फर्नांडिसचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “सिनेमाची…’

Jacqueline Fernandez Post: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत (Ganpat Movie) हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच विकास बहल दिग्दर्शित (Directed by Vikas Bahl) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला, जो पाहून चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना याची उत्सुकता लागली. अनेक सेलिब्रिटी या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. जॅकलीन फर्नांडिस देखील त्यापैकी एक आहे.


नुकतीच जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडियावर (Social media) सिनेमाचे समर्थन करत असल्याचे बघायला मिळत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “गणपतला खूप शुभेच्छा…. टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन या वीकेंडला 20 ऑक्टोबर दिवशी पाहण्यासाठी चाहते आणि मी प्रतीक्षा करू शकत नाही, यामध्ये टायगरबरोबर क्रिती सेनन देखील एकदम हटके अंदाजात अॅक्शन करत असल्याचे दिसणार आहे.

या सिनेमात वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा या शुक्रवारी देशभरात हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन म्हणजेच चाहत्यांचे लाडके बिग बीं देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दक्षिणेच्या दोन मोठ्या सिनेमाशी स्पर्धा करताना दिसणार आहे. टायगर नागेश्वर राव आणि लिओ देखील या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिकीटबार देखील सिनेमामध्ये मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. लिओने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी देशभरात १०० कोटींचा व्यवसाय करण्यात हा सिनेमा नक्कीच यशस्वी होणार आहे.

Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक

कोण आहे जॅकलिन फर्नांडिस?
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मुळची श्रीलंकन आहे. ‘मिस श्रीलंका २००६’चा खिताब नावावर केल्यानंतर जॅकलिनने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला तिने ‘लंका बिझनेस रिपोर्ट’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले होते. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या जॅकलिनला बॉलिवूड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली तिने दिग्दर्शक सुजोय घोष यांच्या ‘अलादिन’ सिनेमातून ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Tags

follow us