Jailer Actor Arrested : दारूच्या नशेत ‘जेलर’ फेम अभिनेत्याचा धिंगाणा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Jailer Actor Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला आहे. (Vinayakan Arrested ) आता या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला (Vinayakan) पोलिसांनी अटक केले आहे. बातमी अपडेट होत आहे… Actor #Vinayakan Has Been Arrested For Causing Nuisance at […]

Jailer Actor Arrested

Jailer Actor Arrested

Jailer Actor Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमवला आहे. (Vinayakan Arrested ) आता या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विनायकनला (Vinayakan) पोलिसांनी अटक केले आहे.

बातमी अपडेट होत आहे…

काय आहे नेमकं प्रकरण?
अभिनेता विनायकनला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीस ठाण्यात अभिनेत्याने दारुच्या नशेत धिंगाणा केला आहे. विनायकन यांना त्यांच्या सोसायटीत काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याने चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात धिंगाणा घातल्यामुळे विनायकनला अटक करण्यात आली.

दारूच्या नशेत विनायकन पोलिस ठाण्यात गेला होता. त्यावेळी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसोबत त्याने विनाकारण धिंगाणा घातला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी त्याच्यावर गोंधळ घालणे आणि पोलिसांवर अश्लील भाषेत बोलण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित

विनायकन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील अभिनेता असण्यासोबत संगीतकार आणि पार्श्वगायक आहे. मल्याळम आणि तामिळ चित्रपटात त्याने काम केलं आहे. 1995 रोजी ‘मत्रिकम’ या सिनेमाच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत एन्ट्री केली होती. तसेच 2016 मध्ये ‘कमातीपद्म’ या चित्रपटातील कामासाठी त्याला केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड देण्यात आला होता.

Exit mobile version