Download App

जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चे बॉलिवूडकरांकडून कौतुक

  • Written By: Last Updated:

मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं.

यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, अनुभव सिन्हा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती यावर चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी, दिग्दर्शक आणि लेखिका अश्विनी अय्यर तिवारी, दिग्दर्शक आनंद एल राय, दिग्दर्शक कबीर खान, दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ 16 डिसेंबर 2022 रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग आधीच अनेक विक्रम मोडत आहे. चित्रपटाला जगभरातून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. सेलिब्रिटींशिवाय बॉलिवूडचे टॉप डायरेक्टर्स या चित्रपटाबद्दल आपली मते मांडण्यासाठी पुढे आले.

follow us