Download App

Mr And Mrs Mahi: जान्हवी अन् राजकुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ ची रिलीज डेट ढकलली पुढे

  • Written By: Last Updated:

Mr And Mrs Mahi: अभिनेता राजकुमार राव (Janhvi Kapoor) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Rajkummar Rao) या दोघांच्या ‘रुही’ या सिनेमानंतर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करत असल्याचे दिसत आहेत. लवकरच त्यांचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr And Mrs Mahi) हा आगामी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती, पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.


करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाच्या रिलीज डेटची नवीन अपडेट माहिती समोर आली आहे. 15 मार्च 2024 दिवशी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती जुलै महिन्यामध्ये धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली होती. परंतु आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा सिनेमा 19 एप्रिल 2024 दिवशी रिलीज करण्यात येणार आहे.

‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा शरण शर्मा यांनी केले आहे. तर शरण शर्मा यांनी ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या सिनेमाच्या माध्यामातून दिग्दर्शनात एन्ट्री केले होते. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता, झी स्टुडिओ यांनी केली आहे.

Diwali Party 2023 : अमृतपाल सिंगच्या दिवाळी पार्टीत किंग खानची रॉयल एन्ट्री, सुहानानं वेधल्या नजरा

एप्रिल महिन्यात ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले होते. धर्मा प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देण्यात समोर आली होती. आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सिनेमासोबत धोनीचं कनेक्शन राहणार आहे का? या सिनेमात आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास चाहते देखील मोठे उत्सुक झाले आहेत.

Tags

follow us