Download App

कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड? गळ्यातील लॉकेटचा फोटो समोर येताच सोशल मिडीयावर चर्चा

Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियामुळे (Shikhar Paharia) सतत जोरदार चर्चेत असते. जान्हवी आणि शिखर अनेक ठिकाणी एकमेकांसोबत दिसले आहेत. (Social media) गेल्या काही दिवसाखाली जान्हवी अजय देवगण स्टारर ‘मैदान’ च्या स्पेशल स्क्रिनिंगला गेली होती. त्यावेळेस पुन्हा एकदा जान्हवी शिखरच्या संदर्भात चर्चेत आली आहे. तिच्या कस्टमाईज्ड नेकलेसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नेकलेसमध्ये नेमकं काय आहे? चला मग जाणून घेऊया…

9 एप्रिल रोजी ‘मैदान’चे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूरसोबत आली होती. या कार्यक्रमात ती पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करून खूपच सुंदर दिसत होती. तिच्या आउटफिटशिवाय तिचा नेकलेसही चर्चेचा विषय बनला आहे. जान्हवीच्या नेकलेसवर तिच्या कथित बॉयफ्रेंडचे नाव ‘शिखू’ असे लिहिले होते.

‘कॉफी विथ करण’मध्ये उघड झाले हे रहस्य

‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये जान्हवीला विचारण्यात आले की तिच्या स्पीड डायलवर कोण होते? त्याला उत्तर म्हणून तिने तीन लोकांची नावे घेतली आणि म्हणाली की, “पापा, खुशू आणि शिकू.” जान्हवीने ‘शिकू’ हे नाव घेताच ती लाजली होती, आणि तिच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होते की तिने चुकून ‘शिकू’ हे नाव सांगितले होते, जे तिला कदाचित घ्यायचे नव्हते.

मात्र, नंतर तिने आपला मुद्दा स्पष्ट केला आणि शिखर हा फक्त त्याचा चांगला मित्र असल्याचे सांगितले. यानंतर तेथे उपस्थित सर्वजण हसू लागले. शिखर पहाडिया हे सुशील कुमार शिंदे (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री) यांचे नातू आहेत. अलीकडेच जान्हवी-शिखर आणि आरी तिरुमला मंदिरात एकत्र दिसले. जान्हवीच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी शिखरने इंस्टाग्रामवर काही रोमँटिक फोटो शेअर केले होते, जे पाहून चाहते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधत होते.

Box Collection : ‘मैदान’ चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्या दिवसाची कमाई किती? जाणून घ्या

जान्हवीचा आगामी चित्रपट

जान्हवी कपूर लवकरच ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत साउथ चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. याशिवाय जान्हवी राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसणार आहे.

follow us