Download App

Janhvi Kapoor होणार सोलापूरची सून?; माजी मुख्यमंत्र्यांचा नातवाला करतेय डेट

  • Written By: Last Updated:

Janhvi Kapoor: बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे आगामी बवाल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आज बॉलीवूडमध्ये (Bollywood) चर्चेतले नाव बनत आहे. ‘धडक’ सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवीनं आतापर्यंतच्या तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक वेगवेगळ्या सिनेमांतून तिने आपली अभिनय कला दाखवली आहे.


अभिनयासोबतच जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम चरहसत असते. ती नेहमीच आपले हॉट अॅन्ड बोल्ड फोटो, व्हिडीओ शेअर करत असताना दिसून येत असते. तिच्या फोटो- व्हिडीओवर तिचे चाहते देखील खूप चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. सध्या जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी एका अनोळखी मुलाचा हात मोठ्या प्रेमाने धरुन चालत असताना मीडियाला स्पॉट झाली. यावेळी ती एका ब्लॅक कलरच्या हॉट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसून आली आहे.

तिच्या या लूकची देखील जोरदार चर्चा होत आहे. परंतु चर्चा होत आहे ती तिच्या सोबत असलेल्या बॉयफ्रेंडची.जान्हवी कपूर हिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (shikhar pahariya) हा देखील होता. जान्हवी कपूर हिच्यासोबत प्रत्येक पार्टीमध्ये शिखर पहाडिया हा देखील दिसून आला आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर आणि शिखर यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले असून ते बालपणीचे मित्र आहेत. नुकताच जान्हवी कपूर ही अर्जून कपूर याच्या घरी पार्टीसाठी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा देखील होता.

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर

जान्हवी कपूर हिच्यासोबत प्रत्येक पार्टीमध्ये शिखर पहाडिया हा दिसतो. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची यांची मुलगी स्मृती शिंदे तर आमदार प्रणिती शिंदे हिचा भाचा शिखर पहाडिया हा आहे. अत्यंत लग्झरी लाईफ शिखर पहाडिया हा राहत असतो. त्याचे काही बिझनेस देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा या रंगताना असताना दिसून येत आहेत. मोठ्या संपत्तीचा मालक हा शिखर पहाडिया असून लग्झरी गाड्यांचे त्याच्याकडे मोठे कलेक्शन आहे. एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा बिजनेस शिखर पहाडिया करत आहे.

Tags

follow us