Download App

Jasmine Bhasin पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिला?

Jasmine Bhasin : टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmine Bhasin) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हिजननंतर जास्मिनने पंजाबी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. यामध्ये हनिमून हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर ती आता पुन्हा एकदा गिप्पी ग्रेवाल त्याच्यासोबत आगामी ‘वार्निंग टू’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

“सिद्धरामय्या योग्यच बोलले, आधी महाराष्ट्रात लक्ष द्या..”. : अशोक चव्हाणांनी शिंदे सरकारला फटकारले!

या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सुडाचा रक्तरंजित खेळ दिसत आहे हा चित्रपट 2021 मध्ये आलेल्या आय सस्पेन्स आणि ॲक्शन ने भरपूर असलेल्या मॉर्निंग चित्रपटाचा सिक्वल आहे. त्यामुळे या सिक्वलमध्ये देखील प्रेक्षकांना भरपूर ॲक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवाल हे मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच गिप्पी हाच मुख्य भूमिकेसह या चित्रपटाचा सहनिर्माता आणि पटकथा देखील त्यानेच लिहिलेली आहे.

Sonali Kulkarni : नऊवारी साडी, नाकात; मराठमोळ्या सोनालीच्या लूकवर नेटकरी फिदा

2 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेता गिप्पी ग्रेवाल म्हणाला की, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, तसेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने आम्ही अत्यंत उत्साहात आहोत, प्रेक्षकांच्या या ट्रेलरवर भरभरून कमेंट्स येत आहेत, त्यामुळे मला आशा आहे की, असंच प्रेम आमच्या चित्रपटालाही मिळेल.

हा चित्रपट सारेगामा इंडिया फिल्म आणि हंबल मोशन पिक्चर्स यांच्याद्वारे निर्माण करण्यात आला असून त्यामध्ये गिप्पी आणि जस्मिन यांच्याशिवाय राहुल देव, प्रिन्स कंवलजीत सिंह आणि रघुवीर बोली हे देखील दिसणार आहेत.

follow us