Download App

Jawan Review: शेतकऱ्यांची आत्महत्या अन् ट्रॅक्टरवर १३ टक्के व्याज…किंग खानचा ‘जवान’ देतोय खास मेसेज

Jawan Dialogues: मनोरंजन क्षेत्रातील बाहशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. (Social media) अखेर जवान आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला.


‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर….’ जवान सिनेमाच्या प्रदर्शनाअगोदर हा संवाद (Dialogues) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर लोकांनी या डायलॉग्जचा संबंध आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी लावला. कारण एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी हा संवाद जोडण्यता आला. परंतु समीर वानखेडेंनी देखील उत्तर दिलं होतं. जवान सिनेमातील केवळ हा एकच नाही तर इतर अनेक संवाद जोरदार चर्चेत येत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून कॉर्पोरेट कर्जमाफीवर या संवादातून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर निवडणुकीत लोकांनी आपलं मत जात-पात किंवा धर्म बघून देऊ नका, असं आवाहन देखील या सिनेमातून किंग खानने (Shah Rukh Khan) केलं आहे. mnhjhj

– मैं हूं भारत का नागरिक। बार-बार नए लोगों को वोट देता हूं, लेकिन कुछ नहीं बदलता है।

– तुम्हारे एग्रीकल्चर मिनिस्टर रहते हुए पिछले एक साल में १०,२०८ किसानों ने आत्महत्या की है।

– यहां गरीब किसान के ट्रैक्टर पर १३ फीसदी बयाज है और अमीरों की मर्सिडीज पर सिर्फ 8 फीसदी।

– सिस्टम ने रातों-रात तुम्हारे बाप के ४०,००० करोड़ माफ कर दिए और मात्र ४०,००० के लिए तुम्हारे इस सिस्टम ने इसके बाप के साथ पता है क्या किया।

– किसान की आत्महत्या पर २ लाख रुपये देती है ये सरकार, इसलिए उसने अपनी जान ले ली।

– कश्मीर से लेकर कन्या कुमारी तक हर किसान की यही कहानी है।

Jawan: ‘जवान’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने किंग खान भारावला; ट्वीट करत म्हणाला…

या सिनेमात अॅक्शन, रोमान्ससोबत सिनेमातून उत्तम मेसेज प्रेक्षकांना आवाहन करत असल्याचे बघायला मिळत आहे. आपलं मत देण्याअगोदर, ५ वर्षाचं सरकार निवडण्याच्या आधी उमेदवारी जात किंवा धर्म पाहू नका, तो ५ वर्षामध्ये तुमच्यासाठी काय करु शकणार आहे, आधी हे बघा असं आवाहन किंग खानने यावेळी केलं आहे.

सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत किंग खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

Tags

follow us