Jawan: “डोक्यावर टक्कल अन् हातात बंदूक”; ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, किंग खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

Jawan movie New Poster : ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सध्या किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ सिनेमा चाहत्यांच्या येत्या ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे. किंग खानने (King Khan) नुकतेच सोशल मीडियावर (Social media) जवान सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) हटके […]

Jawan movie New Poster

Jawan movie New Poster

Jawan movie New Poster : ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सध्या किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ सिनेमा चाहत्यांच्या येत्या ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे. किंग खानने (King Khan) नुकतेच सोशल मीडियावर (Social media) जवान सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) हटके लूक बघायला मिळत आहे.


‘जवान’ सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी बरोबर ३० दिवस बाकी राहिले असतानाच किंग खानने हे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये किंग खानच्या डोक्यावर टक्कल, हातात बंदूक, डोळ्याला गॉगल असा हटके लूक सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. हे नवीन पोस्टर शेअर करत किंग खानने सांगितले आहे की, “मी चांगला आहे की वाईट? (मैं अच्छा हूं या बुरा हूं) फक्त ३० दिवस बाकी…तुम्ही तयार आहात ना?”

बहुचर्चित ‘जवान’ आजपासून ३० दिवसांनी म्हणजेच ७ सप्टेंबरला चाहत्यांना सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. किंग खानच्या दुहेरी भूमिका असल्याने खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने टक्कल केले असावे असा अंदाज चाहते लावत आहेत.

Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, किंग खानच्या ‘जवान’ सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेते विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी असे दिग्गज कलाकार हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन अ‍ॅटलीने केले आहे, तर निर्मितीची धुरा गौरी खानने सांभाळली आहे.

Exit mobile version