Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स अन् अ‍ॅक्शन सीन्स; किंग खानचा धमाकेदार ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

Jawan Trailer Release: अभिनेता किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानचे चाहते जवान या सिनेमाच्या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते. जवान सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात “एक राजा था एक के बाद एक जंग हारता […]

Jawan movie New Poster

Jawan movie New Poster

Jawan Trailer Release: अभिनेता किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानचे चाहते जवान या सिनेमाच्या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते.

जवान सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात “एक राजा था एक के बाद एक जंग हारता गया” या डायलॉगनं होते. तसेच ट्रेलरमध्ये काही अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहे. जवान सिनेमाच्या ट्रेलरमध्ये किंग खानसोबतच अभिनेता विजय सेतूपती, दीपिका पादुकोण आणि नयनतारा यांची देखील झलक बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या शेवटी रमैया वस्तावैया हे गाणं ऐकू येतं. आता जवान सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

https://twitter.com/iamsrk/status/1697134467461046386?s=20

किंग खानच्या जवान सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘Of Justice & A Jawan, Of Women & their Vengeance,Of a Mother & A Son. And of course, a lot of Fun!!’ जवान हा सिनेमा 7 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाचा प्री व्ह्यू आणि सिनेमामधील गाणी गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

जवान सिनेमामधील ‘जिंदा बंदा’, ‘चलेया’ आणि ‘नॉट रमैया वस्तावैया’ ही गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. या गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. या गाण्यांमध्ये किंग खानचा हटके अंदाज चाहत्यांना बघायला मिळाला आहे. जवान हा सिनेमा अ‍ॅटलीनं दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा किंग खानच्या पठाण सिनेमाप्रमाणे बॉक्स ऑफिवर जोरदार कमाई करेल का? याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version