Jaya Bachchan पुन्हा मीडियावर वैतागल्या! म्हणाल्या, ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना त्यांच्या अभिनयासोबतच रागीट स्वभावासाठी नेहमी ओळखले जात असते. त्या सतत चिडचिड करत असताना दिसून येत असतात, आणि कायम पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video Viral) होत असताना दिसतात.   View this post on Instagram   A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) आता जया […]

Jaya Bachchan

Jaya Bachchan

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना त्यांच्या अभिनयासोबतच रागीट स्वभावासाठी नेहमी ओळखले जात असते. त्या सतत चिडचिड करत असताना दिसून येत असतात, आणि कायम पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Video Viral) होत असताना दिसतात.


आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये त्या पुन्हा एकदा फोटो काढणाऱ्यांवर संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. नुकतंच मुंबईमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सिनेसृष्टीत काही दिग्गज लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. या कार्यक्रमाला जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन तसेच अभिषेक बच्चन असे मोठे सेलिब्रिटी हजेरी लावल्याचे पाहायला मिळले आहे. यावेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये काही पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी ओरडत असताना दिसून येत आहेत. जया जी, जया जी असे ते बोलत असताना  दिसत आहेत. त्यावेळी जया बच्चन या मागे वळून बघतात आणि “मला ऐकू येतं. मी बहिरी नाही. थोडं हळू बोला’, असे रागात बोलायचे दिसून येत आहे.यानंतर श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन आल्यावर त्या निघून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यावर अनेकजण कमेंट करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे.

करीना कपूर चाहत्यांशी कशी वागली? नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा

“या कारणामुळे आम्हाला रेखा आवडतात. त्या अजिबात भडकत नाही आणि अॅटिट्यूड देखील कधी दाखवत नाहीत”, असे एकाने कमेंट करत सांगितले आहे. “त्या शाळेची मुख्याध्यापिका असल्याप्रमाणे वागत असतात”, अशी कमेंट दुसऱ्याने केल्याचे बघायला मिळत आहे. “याचबरोबर ऐश्वर्या कशी राहत असेल”, असे एकाने कमेंट करत त्यांना सवाल विचारला आहे.

Exit mobile version