Download App

Kaustubh Savarkar Post: ‘असा तो एक पांतस्थ’; वडिलांच्या आठवणीत कौस्तुभ सावरकर भावूक!

Kaustubh Savarkar Post: मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तसेच प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे जयंत सावरकर (Jayant Sawarkar ) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची कला चाहत्यांना दाखवली होती.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

जयंत सावरकर (Kaustubh Savarkar) यांनी वडिलांच्या आठवणीत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांविषयी भाष्य करत त्यांच्यासोबतच्या आठवणीमध्ये गुंतून गेल्याचे दिसून येत आहे.


मित्रहो माझ्या वडिलांनी म्हणजे जयंत सावरकर ह्यांनी काल ह्या जगाच्या नाटकतून exit घेतली ती कायमची, काही वर्षांपूर्वी ते हयात असताना मी त्यांच्या आणि माझ्या नात्यावर एक कविता केली होती, त्याचा अर्थ आज जाणवतोय प्रत्येक क्षणाला, ती कविता मी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तो एक जन्मजात पांतस्थ
आयुष्यभर त्याचं बोट पकडून चाललो,
आज त्याच्या पावलावर पाऊल नाही टाकत,
स्वतःच्या वेगळ्या वाटा तयार केल्यायत,
कालच्या कटू आठवणी राहतात लक्षात,
पण त्याने जीव ओवाळून टाकलाय हे आज कळतंय,
तो आजही आहे माझ्या आजूबाजूला,
पण…
हृदयात तो नेहमीच असेल,
तो जेव्हा नसेल तेव्हाही,
त्यानं फार पैसा नाही दिला,
ह्याचा त्रास, त्रागा आयुष्यभर केला,
पण…
गरजांवर बंधनं घालायला शिकवलं त्यानं,
असा तो आज आहे, उद्या नसेलही,
त्याचं असणं नसणं आपल्या हातात नाही,
पण आयुष्यभर तो कायम मनात घर करून राहील,
असा तो एक पांतस्थ.
कौस्तुभ सावरकर

अशी भावुक पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us