Download App

कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जितेंद्र अन् सचिन पिळगावकर पोहोचले भेटीला

Junior Mehmood Health: अभिनेता नईम सय्यद उर्फ ​​ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी लीव्हरने (Johnny Lever) ज्युनियर मेहमूद यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता अभिनेता जितेंद्र (Jitendra) आणि अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीही ज्युनियर मेहमूदची भेट घेतली आहे.


ज्युनियर महमूदला पाहून जितेंद्र भावूक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. ज्युनियर मेहमूदने आपले जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर जितेंद्र आणि सचिन पिळगावकर ज्युनियर महमूदला भेटायला आले होते.

ज्युनियर महमूदच्या तब्येतीबद्दल विचारत असताना जितेंद्र हे भावूक झाल्याचे बघायला मिळाले. सचिन पिळगावकर यांनी ज्युनियर महमूदशी व्हिडीओ कॉलवरही चर्चा केली होती. तरीही त्यांनी ज्युनियर महमूदला भेटायलाही आल्याचे दिसत होते.

सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी चाहत्यांना ज्युनियर महमूद लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, माझा बालपणीचा मित्र ज्युनियर महमूद हा एका आजाराने त्रस्त आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो आणि आज त्याला प्रत्यक्ष भेटायला आलो आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सलाम काझी म्हणाले होते, ‘ज्युनियर महमूद दोन महिन्यांपासून आजारी होता. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्याला काही किरकोळ तब्येतीची समस्या असेल, पण नंतर अचानक त्याचं वजन कमी होऊ लागलं आणि त्यांचा मेडिकल रिपोर्ट आला तेव्हा कॅन्सर असल्याची माहिती समोर आली.

Neha Joshi: अटलबिहारी वाजपेयींच्या आईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

ज्युनियर मेहमूदने जितेंद्रसोबत कारवां या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने जितेंद्रच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक वेगवेगळ्या भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यामध्ये ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977) आणि दो और दो पांच (1980) सारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

Tags

follow us