Kon Honaar Crorepati: परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार विशेष भाग

Kon Honaar Crorepati: परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार विशेष भाग

Kon Honaar Crorepati: सध्या मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचं हटके सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे. या आठवड्यातही या कार्यक्रमात शनिवारच्या विशेष भागात खास पाहुणे पाहायला मिळणार आहेत. मागील भागात सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि मुलगी श्रिया पिळगावकर यांनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)


यंदाच्या विशेष भागात लोकप्रिय अभिनेते परेश रावल (Actor Paresh Rawal) आणि दिग्दर्शक विजय केकंरे (Directed by Vijay Kekanre) हे कलाकार हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे या कार्यक्रमाचा खेळ खेळणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेले परेश रावल यांनी आजवर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. या निमित्ताने मराठी कार्यक्रमात येण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे.

मराठी भाषेसोबत त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखं नातं जोडल गेले आहेत. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या विशेष भागात पाहायला मिळेल. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेल्या ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.

या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल रंगणार आहे. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल एवढं नक्की. ‘कोण होणार करोडपती’ चा हा विशेष भाग १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube