Download App

Jiah Khan आत्महत्येप्रकरणी अखेर 10 वर्षांनी निकाल लागणार, नेमकं प्रकरण काय?

Jiah Khan case: ‘गजनी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या (Actress Jiah Khan) आत्महत्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. जिया खानने ३ जून २०१३ मध्ये मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (Jiah Khan Suicide case) अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांसहित इंडस्ट्रीतल्या सर्व लोकांना मोठा धक्का बसला होता.

याप्रकरणी जियाच्या आईने तिचा बॉयफ्रेंड- अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणाला आता तब्बल १० वर्ष उलटली आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागले आहे. जियाच्या आईने आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आपल्या जबाबात सांगितले होते. त्यांनी जियाचा बॉयफ्रेंड- अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप लावण्यात आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

सूरज पांचोली आणि जिया खान यांचं अफेअर होतं. आणि यादरम्यानच अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत होते. सूरज पांचोली सध्या जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात सूरज पांचोली चांगलाच अडकला होता. आता त्याच्याविषयी मोठा निर्णय उद्या मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी मुंबईतील न्यायालय २८ एप्रिल म्हणजेच उद्या शुक्रवारी निकाल देण्याची शक्यता आहे.

अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी २० एप्रिल दिवशी अंतिम युक्तिवादाची सुनावणी पूर्ण केली होती आणि खटला निकालासाठी राखून ठेवला होता. जियाने सूरज पांचोलीबरोबर तिच्या नात्याचे वर्णन करणारे ६ पानांचे पत्र लिहिले होते. या आधारे पांचोलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. १ जुलै २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.

Janhvi Kapoor: इव्हेंटमधील ‘त्या’ ड्रेसमुळे जान्हवी कपूरला चाहत्यांनी सुनावलं, “म्हणाले…”

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो कोर्टाने निकाल दिल्याने सूरज पांचोली अखेर जिया खान प्रकरणातुन सुटणार की अडकणार हे उद्या समजणार आहे. २८ एप्रिलला आता सूरज विषयी काय निकाल लागणार ते समजणार आहे. त्याचे कुटुंबीय सध्या चिंतातुर येथे आहेत. त्याच्या कुटुंबीयांना शांतता राखण्यास आणि पत्रकारांशी न बोलण्यास सांगितले आहे.

तरुण अभिनेत्याच्या जवळच्या मित्राने नाव न सांगता सांगितले होते की, ”सूरजने पुरेसा त्रास सहन केला आहे. १० वर्षांपासून त्याच्या डोक्यावर लटकती तलवार आहे. हे प्रकरण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्याच्या डोक्यावर घिरट्या घालणार आहे. गेल्या १० वर्षांत त्याला काहीही उपभोगता आले नाही. तो काम करत असो किंवा घरी आराम करत असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवत असो, तो अंडरट्रायल आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

ही सध्याची त्याची वस्तुस्थिती सावलीसारखी त्याच्या मागे लागली आहे. हे तुरुंगात न राहता तुरुंगात राहण्यासारखे आहे. अशा भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री जिया खानने ‘निशब्द’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होते. अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

तिच्या खोलीतून एक सुसाईड नोट देखील सापडली ज्यामध्ये ती आणि तिचा प्रियकर सूरज पांचोली यांच्यात काही चांगले चालत नसल्याचे उघड झाले होते. सूरजविरोधात हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला आणि नंतर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक देखील करण्यात आली होती. या वृत्तांवर विश्वास ठेवला तर जियाने तिचा शेवटचा फोन सूरजला केला होता.

Tags

follow us