Jitendra Awhad : 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची (69 National Film Awards) घोषणा करण्यात आली. आणि पुरस्कार जाहीर झालेल्या कलाकृतींचं सर्वत्र कौतुक बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे ज्या कलाकृतींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच्यापेक्षा चांगल्या कलाकृती असल्याचे अनेकांचे मत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील ट्वीट करत यावर भाष्य केले आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं.
पण जय भीम या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 25, 2023
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार समारंभ जाहीर झाला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते मलापण माहीत नाही. परंतु त्यांना ‘कश्मीर फाइल्स’ या सिनेमाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. परंतु ‘जय भीम’ या सिनेमाचा या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील या वर्षातील सिनेमा ‘जय भीम’ (Jai Bhim) हा होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे ‘जय भीम’ सिनेमालाच”.
Prasad Oakच्या ‘परिनिर्वाण’ आगामी सिनेमात झळकणार गौरव मोरे; स्वतःच खुलासा करत म्हणाला…
असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ‘जय भीम’ हा सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार दिला नाही. परंतु जगाने मात्र या सिनेमाला प्रेमाचा पुरस्कार दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच दोन्ही सिनेमामध्ये जय भीम हा उत्तम आहे, अशा कमेंट्स नेटकरी करत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘जय भीम’ या सिनेमाला एकही पुरस्कार घोषित न झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत खंत व्यक्त केल्याचे बघायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांच्या निवडीविषयी जोरदार चर्चा सुरू होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘जय भीम’ हे दोन्ही सिनेमे सामाजिक विषयांवर आधारित आहेत.