Prasad Oakच्या ‘परिनिर्वाण’ आगामी सिनेमात झळकणार गौरव मोरे; स्वतःच खुलासा करत म्हणाला…

Prasad Oakच्या ‘परिनिर्वाण’ आगामी सिनेमात झळकणार गौरव मोरे; स्वतःच खुलासा करत म्हणाला…

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरे कायम चर्चेत असतो. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा फेमस डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. या डायलॉगमुळे गौरवची होणारी एन्ट्री कायम त्याच्या केसांमुळे हिट ठरते. विनोदी शैलीसोबतच त्याची केसांची हेअरस्टाईल देखील चाहत्यांना खूपच लोकप्रिय वाटते. परंतु मानेपर्यंत असलेले केस गौरवनं आता कानावरपर्यंत कापल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)


यामुळे तो सध्या जोरदार चर्चेत येत आहे. परंतु हे केस त्यानं प्रसाद ओकच्या एका आगामी सिनेमाच्या निमित्तानं कापल्याचा खुलासा केलं आहे. गौरवचा ‘अंकुश’ हा आगामी चित्रपट ६ ऑक्टोबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी गौरवनं संवाद साधला आहे. यावेळी त्याला काही सवाल विचारण्यात आले.

‘जेव्हा तू या लूकमध्ये स्वतःला पहिल्यांदा आरशात बघितलं, तेव्हा तुला काय वाटलं?’ यावर गौरव म्हणाला की, “माझी ही खरी कॉलेजमधली हेअरस्टाईल आहे. अगोदर मला कानावरती केस आले की आवडत नसायचे. परंतु आता असं झालं आहे की, मी एक नवीन सिनेमा करत आहे, ‘परिनिर्वाण’. त्याकरिता दिग्दर्शक आणि डिझायनरनं सांगितल्याने मला थोडं बदलावं लागलं आहे. सिनेमात जुना काळ आहे. यामुळे मी सांगितले आहे, ओके ठीक आहे.

KBC 15: सोलापूरच्या तरुणाची संघर्षाची गोष्ट जाणून ‘बिग बी’ही झाले भावुक, म्हणाले…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘परिनिर्वाण’ हा सिनेमा असणार आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या सिनेमात दाखवण्यात येणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.

दरम्यान गौरवच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच एका हिंदी सिनेमात देखील बघायला मिळणार आहे. ‘सांगी’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात अभिनेता शरिब हाशमी आणि विद्या माळवदे यांची मुख्य भूमिका असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube