Jitendra Joshi : व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने व्यक्त केली मनातील सुप्त इच्छा !

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर तो नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असतो. मात्र यावेळी तो थेट शेफ बनून एका हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसला. तो अशा प्रकारे स्वयंपाक करताना दिसल्याने चाहते देखील आवाक् झाले आहेत. जितेंद्र जोशीने नुकतचं त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एका हॉटेलच्या किचनमधला […]

Jitendra Joshi

Jitendra Joshi

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर तो नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असतो. मात्र यावेळी तो थेट शेफ बनून एका हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसला. तो अशा प्रकारे स्वयंपाक करताना दिसल्याने चाहते देखील आवाक् झाले आहेत.

जितेंद्र जोशीने नुकतचं त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एका हॉटेलच्या किचनमधला व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो अ‍ॅप्रॉन घालून स्वयंपाक करताना दिसला. कांदा कापण्यापासून ते भाज्यांना फोडण्या घालण्यापर्यंत तो अगदी ट्रेन शेफ प्रमाणे करताना दिसत आहे. जितेंद्र जोशीला लेखन आणि अभिनय याचबरोबर स्वयंपाक करायला देखील तितकेच आवडते. त्यामुळेच तो स्वयंपाक करताना दिसला आहे.

या व्हिडीओला कॅप्शन देताना जितेंद्र जोशीने लिहीले की, मला तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक करू दिल्याबद्दल बाराग्रह रेस्टॉरंटची टीम आणि नंदलालाजी यांचे आभार. त्याचबरोबर मी बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चांगल्या प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व खवय्यांचे देखील खूप आभार. असं म्हणत जितेंद्रने त्यांचे आभार मानले आहेत.

त्याचबरोबर यामध्ये जितेंद्र जोशी पुढे लिहितो की, लेखन आणि अभिनय याचबरोबर स्वयंपाक करणे हे माझे पॅशन आहे. त्यामुळे घराबाबतीत देखील माझे स्वप्न वेगळे आहेत. मला गाड्या, एखाद मोठ फार्म हाऊस यांची हौस नाही. पण मला सर्व सुविधा असणारं मोठं किचन माझ्या घरात असावं असं नेहमी वाटत.

यावेळी अभिनेता जितेंद्र जोशीने हा रिल व्हिडीओ शेअर बनवणाऱ्या सुनिल नवले यांचे देखील आभार मानले आहेत. तसेच त्याने जितू की रसोई असा हॅसटॅग देखील या कॅप्शनमध्ये दिला आहे.

Exit mobile version